viral video: डोंबिवलीत Excuse me बोलण्यावरून जोरदार राडा, 2 तरुणींना भर रस्त्यात मारहाण

जो व्हिडीओ व्हायरल होत आहे त्याची सत्यता पडताळल्यानंतर तो व्हिडीओ डोंबिवलीचा असल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
डोंबिवली:

अमजद खान 

बँकामध्ये मराठी बोलले पाहीजे असा आग्रह मनसेने धरला आहे. त्यामुळे मनसैनिक अनेक बँकांमध्ये धडकत आहेत. शिवाय काही नागरिकही मराठीत बोलण्यासाठी आग्रह धरतानाचे व्हिडीओ गेल्या काही दिवसात जोरदार व्हायरल झाले आहेत. त्यातून अनेक ठिकाणी वाद ही झाले आहेत. मग ते मोबाईल गॅलरी असो की सिक्युरिटी गार्ड असो. अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यात आता डोंबिवलीतला ही एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. इथं Excuse me बोलण्यावरून जोरदार राडा झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जो व्हिडीओ व्हायरल होत आहे त्याची सत्यता पडताळल्यानंतर तो व्हिडीओ डोंबिवलीचा असल्याचं समोर आलं आहे. त्यात दिसणाऱ्या दोन तरुणींचीही ओळख पटली आहे. पुनम गुप्ता आणि गीता चौहान असं या दोन तरुणींचं नाव आहेत. या दोघी ही उत्तर भारतीय आहेत. या दोघी दुचाकी वरून चालल्या होत्या. त्यावेळी तिथं तिन मुलं उभी होती. त्यांना त्या  Excuse me  म्हणाल्या. शिवाय बाजूला होण्यासाठी सांगितलं. पण त्यातील एका तरुणाने मराठीत बोला इंग्रजीत का बोलता अशी विचारणा केली. त्यावर त्या पैकी एकीने मला मराठी येत नाही, मला जी भाषा येते त्या भाषेत बोलणार असं तिने सांगितलं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Raj Thackeray: लोकसभेत राज ठाकरेंचा विषय, हिंदी भाषिक खासदार आक्रमक, वाद पेटणार?

त्यानंतर ती तिन मुलं आक्रमक झाली. गाडीच्या पुढे बसलेल्या गीता चौहान हिला मारहाण करण्यात आलं. त्यात तिच्या डोक्याला जखमी झाली. रक्त बाहेर आलं, असा आरोप गीता हिने केला आहे. त्यानंतर तिथं असलेल्या महिला ही जमा झाल्या. त्या सर्वांनी मिळून गीता आणि पुनम या दोघींनाही मारहाण केली. आपल्याला दांडक्याने मारहाण झाल्याचा आरोपही गीता हिने केला आहे. आपल्या बहिणीला ही मारहाण झाल्याचं गीता हिने सांगितले. याचा आपण व्हिडीओ ही काढला असल्याचं तीने स्पष्ट केलं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Pune News: बिलासाठी मृतदेह अडकवला, अंत्यविधी वेळी ही फोन, दीनानाथ रुग्णालयातला आणखी एक प्रताप

रात्री साडे नऊच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. त्यानंतर गीता आणि पुनम यांनी विष्णूनगर पोलिस स्थानकात धाव घेतली. झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. या प्रकरणी अनिल पवार, बाळासोहब डबाले आणि नितेश डबाले यांच्या विरोधात विष्णूनगर पोलिस ठाण्यात एनसी दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही, याबाबत गीता आणि पुनम यांनी आश्चर्य वक्त केलं आहे. मुलांनी मुलीवर हात कसा काय उचलला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Cabinet Decision : राज्यात झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे 9 निर्णय

त्यावेळी नक्की काय झालं हे गीत चौहान हिने सांगितले. ती म्हणाली आम्ही दोघी गाडीवरून निघालो होता. घराकडे जाणाऱ्या रस्त्यात तरुण उभे होते. त्यामुळे त्यांना पुनम Excuse me असं म्हणाली. त्यावर मराठीत बोला म्हणून ते तरूण आमच्या अंगावर आले. आम्ही म्हणालं आम्हाला मराठी येत नाही, आम्ही हिंदीत बोलणार, असं म्हणाल्यानंतर त्यातील एका तरुणाने गीताला मारहाण केली. त्यात तिच्या डोक्याला जखम झाली असं तिने सांगितलं. त्यानंतर अनेक जण तिथे जमा झाले. महिला ही आल्या. त्यांनी ही आम्हाला मारलं असा दावा गीताचा आहे.