जाहिरात

Pune News: बिलासाठी मृतदेह अडकवला, अंत्यविधी वेळी ही फोन, दीनानाथ रुग्णालयातला आणखी एक प्रताप

पण सर्व काही इथेच संपले नाही. या रुग्णालयात उपचारासाठी जवळपास 40 लाख खर्च आला. रुग्णालयाने 40 लाखाचे बिल काढले.

Pune News: बिलासाठी मृतदेह अडकवला, अंत्यविधी वेळी ही फोन, दीनानाथ रुग्णालयातला आणखी एक प्रताप
पुणे:

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चुकीमुळे तनिषा भिसे या गर्भवती तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप सध्या होत आहे. त्याती दिनानाथ रुग्णालयात या आधी झालेले एक एक कारनामे समोर येत आहेत. अनेक वर्ष या गोष्टी लपून राहील्या होत्या. मात्र तनिषाच्या मृत्यूनंतर या गोष्टींना आता वाचा फुटली आहे. ज्या जागेवर दीनानाथ रुग्णालय उभे आहे ती जागा पुण्याचे माजी महापौर भाऊसाहेब खिलारे यांनी दिली होती. त्यांचाच मृतदेह या रुग्णालयात देवण्यास नकार देण्यात आला होता, असा आरोप त्यांच्या मुलाने केला होता. त्यानंतर आणखी एक प्रकार समोर आला आहे. त्यात एका डॉक्टरांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. मात्र बिल न भरल्यामुळे त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

डॉ. भारत मारुती लोटे हे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील रामपूर गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते. जवळपास 26 वर्षे त्यांनी या ठिकाणी आपली सेवा दिली. त्यांच्या सेवेचा गौरव राज्य सरकारने केला होता. त्यांना शासनाचे वेगवेगळे पुरस्कारही देण्यात आले होते. गोरगरीबांसाठी त्यांनी केलेलं कार्य हे कौतुकास्पद होते. पण त्याच्या आयुष्याच्या शेवटी त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या. एक डॉक्टर असूनही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना कशा वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले याचा कटू अनूभवच आता डॉ. लोटेंच्या पत्नी संगीता यांनी सांगितला आहे.  

ट्रेंडिंग बातमी - Pune News: दीनानाथ रुग्णालयाचा आणखी एक कारनामा समोर, ज्यांनी हॉस्पिटलला जागा दिली त्यांचाच मृतदेह...

डॉक्टर लोटे यांना मार्च 2017 मध्ये पॅन्क्रियाटिक कॅन्सरचे निदान झाले होते. त्यामुळे त्यावर उपचार घेण्यासाठी त्यांनी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची निवड केली. मात्र उपचारांचा खर्च आणि आर्थिक ओझं इतकं वाढलं की काय करावं असा प्रश्न त्यांच्या समोर पडला होता. कमी पगारात संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेसाठी वाहिलेल्या या डॉक्टरांना इच्छामरणाची मागणी जाहीर पणे त्यावेळी केली होती. त्याच स्थितीत जून 2017 मध्ये डॉ. लोटे यांचं मंगेशकर रुग्णालयात निधन झालं. 

ट्रेंडिंग बातमी - Cabinet Decision : राज्यात झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे 9 निर्णय

पण सर्व काही इथेच संपले नाही. या रुग्णालयात उपचारासाठी जवळपास 40 लाख खर्च आला. रुग्णालयाने 40 लाखाचे बिल काढले. येवढे पैसे आणायचे कुठून असा प्रश्न त्यांच्या पत्नी संगीता लोटे यांना पडला. रुग्णालयाने तर बिल भरा आणि मृतदेह घेवून जा असे सांगितलं. हे ऐकून तर संगीता यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी राज्य सरकार आणि वैद्यकीय विभागाकडे मदतीची याचना केली. पण तेवढासा परिणाम झाला नाही. 24 तास मृतदेह रुग्णालयातच पडून होता. तो संगीता यांच्या ताब्यात दिला नाही. पुढे मुख्यमंत्री कार्यालय आणि वैद्यकीय विभागाच्या हस्तक्षेपामुळे  डॉ. लोटे यांचा मृतदेह पत्नीच्या ताब्यात देण्यात आला.

ट्रेंडिंग बातमी - Cabinet Decision : राज्यात झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे 9 निर्णय

त्यानंतही रुग्णालयाने संगीता लोटे यांची पाठ सोडली नाही.  अंत्यविधीनंतरही रुग्णालयाकडून पाच लाख रुपये उरले म्हणून फोन येतच राहिले. या संपूर्ण दुःखद आणि संतापजनक अनुभवावर आधारित 'इच्छामरण – एक सत्यकथा' हे पुस्तक डॉ. लोटे यांच्या पत्नी संगीता  लोटे यांनी लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी हे धक्कादायक खुलासे केले आहेत. पुस्तकाचं प्रकाशन तीन महिन्यांपूर्वी झालं आहे. हे पुस्तक म्हणजे केवळ एका डॉक्टराच्या मृत्यूची कथा नाही, तर आरोग्य व्यवस्थेतील बेगडी संवेदनशीलतेवरचा जोरदार प्रश्नचिन्ह आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.