राकेश गुडेकर
कॉलेज बाहेरच जोरदार राडा झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ चिपळूणचा असल्याचं ही समोर आलं आहे. विशेष म्हणजे हा राडा अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये झाला आहे. हाणामारी पूर्वी या विद्यार्थ्यांमध्ये शाब्दीक चकमक झाली. त्यात त्यांची भाषा अट्टल गुन्हेगारा प्रमाणे वाटत आहे. ते एकमेकांना धमकी देत आहेत. शेवटी वाद टोकाला पोहोचताना या व्हिडीओत दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. कोणी रस्त्यात पडलं आहे. तर कुणी मागे लागून पळवू पळवून मारत आहेत. हा धक्कादायक प्रकार त्यांच्या पैकीच एका विद्यार्थ्याने मोबाईलमध्ये शुट केला आहे.
चिपळूणमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वादावादीचा आणि हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चिपळूण येथील डी. बी. जे. कॉलेज समोरील रस्त्यावर काही विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली. काही विद्यार्थी दोन विद्यार्थ्यांना उठाबशा काढायला सांगत होते. पण ते उठाबशा काढण्यासाठी तयार नव्हते. ते दोन विद्यार्थी समोरच्या टोळक्याला दाद देत नव्हते. आपण उठाबशा का काढायच्या असं ते सांगत होते. तर समोरच गट जर उठाबशा काढल्या नाहीत तर फटके पडणार असं सांगत होते.
नक्की वाचा - Mhada News: म्हाडाची घरं आणखी स्वस्त होणार, नव्या किंमत ऐकून तुम्ही ही व्हाल आवाक
हे सर्व सुरू असताना धमकी देणारा मुलगा आपल्या मित्राला मोबाईलमध्ये हे सर्व शुट कर असं सांगत होता. त्यानुसार सर्व शुट केलं जात होतं. त्याच वेळी आणखी एक विद्यार्थी तिथे आला. त्याने थेट समोरच्या दोन विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यातून तुफान राडा झाला. पळूपळून विद्यार्थ्यांना मारण्यात आले. कुणी लाथा बुक्क्यांनी मारत होतं तर कुणी हाताने बडवत होतं. हा सर्व राडा सुरू असताना अन्य विद्यार्थी मात्र हे सर्व बघत होते. त्यांना थांबवण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही. शिवाय व्हिडीओ ही शुट केला जात होता.
हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या राड्यात सहभागी असलेली सर्व मुलं ही अल्पवयीन दिसत आहेत. त्यांच्या विरोधात आता जोरदार प्रतिक्रीया उमटत आहेत. विद्यार्थी इतके आक्रमक का होत आहेत. अभ्यासा ऐवजी अशा हणामारीच्या गोष्टींकडे ते का वळत आहेत. ही कसली क्रेझ अशा प्रतिक्रीया ही या माध्यमातून उमटत आहेत. आता कॉलेज प्रशासन या विद्यार्थ्यां विरोधात काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.