Crime News : सुटकेसमधील धडाशिवाय सापडलेल्या मुंडक्याचं रहस्य उलगडलं; महिलेच्या इतर अवयवांचा शोध सुरू

होळीसाठी रानात लाकडं आणण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना तेथे एक सुटकेस आढळली होती. त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Man killed Wife : राज्यभरात होळीचा आनंद सुरू असताना विरारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली होती. मांडवी पोलीस स्टेशनअंतर्गत विरार रस्त्यावर पिरकुंडा दर्ग्याजवळ सुटकेसमध्ये महिलेचे कापलेली शीर आढळून आल्याने विरार परिसरात एकच खळबळ उडाली. विरार रस्त्यावर पिरकुंडा दर्ग्याच्या मागे होळी निमित्ताने स्थानिक ग्रामस्थ लाकडे आणण्यासाठी रानात गेले होते. यावेळी त्यांना एक सुटकेस आढळून आली. या सुटकेसमध्ये एका महिलेचे कापलेले शीर दिसून आले. यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पतीने हत्या करून महिलेचं शीर धडावेगळं केलं आणि सुटकेसमध्ये टाकून जंगलात  फेकल्यांचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात पतीनेच हत्या करून मुंडके सुटकेसमध्ये टाकून जंगलात फेकले होते. आरोपी पती हरीश बसवराज हिप्परगी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उत्पला हिप्परगी (45) असं मृत महिलेचं नाव आहे. विरार रस्त्यावर पिरकुंडा दर्ग्याच्या मागील जंगलात एका सुटकेसमध्ये या महिलेचं धडावेगळं केलेलं शीर आढळलं होतं. अखेर गुन्हे शाखा 3 च्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - होळीसाठी लाकडं शोधायला गेले अन् हातात महिलेचं कापलेलं शीर; मुंबईजवळील धडकी भरवणारी घटना

मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिरकुंड्या दर्ग्याच्या मागे असलेल्या जंगलात होळीच्या दिवशी महिलेचे धड विरहित मुंडकं आढळलं होतं. उत्पला हिप्पारगी (45) असे या मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणात मांडवी पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटवली आहे. गुन्हे शाखा-3 च्या पथकाने आरोपीला अटक केली. होळीच्या दिवशी जंगलात महिलेचा धड नसलेलं मुंडक आढळल्यामुळे विराट परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात अद्यापही तपास सुरू आहे. पतीने महिलेची हत्या का केली, यामागील कारण अद्याप कळू शकलेलं नाही. त्याशिवाय पतीने महिलेच्या शरीराचा इतर भाग कुठे ठेवलाय याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article