Pune News: "केतनच्या हत्येच्या दिवशी काही लोक लोहगडावर..", या प्रकरणाचा फासा पलटणार? विशाल अग्रवाल म्हणाले..

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली आहेत. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनीही लोकांना मोठं आवाहन केलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ketan Agarwal Murder Case Latest Update
पुणे:

Ketan Agarwal Murder Case New Updates : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली आहेत. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनीही लोकांना मोठं आवाहन केलं आहे.केतनच्या हत्येच्या दिवशी जे लोक लोहगड किल्ल्यावर उपस्थित होते,त्यांनी पुढं यावं आणि पोलिसांना माहिती द्यावी. त्यांनी म्हटलंय की,काही लोक आम्हाला मेसेज करून सांगत आहेत की,ते गडावर होते. पण ते पोलिसांना संपर्क करत नाहीत. केतनचे वडील विशाल म्हणाले की,कुटुंबाला फक्त न्याय मिळण्याची अपेक्षा आहे.जोपर्यंत आमच्या मुलाला न्याय मिळत नाही,आम्ही लढत राहू. घटनेच्या दिवशी लोहगडावर अनेक लोक होते.त्या लोकांनी पुढे येऊन या घटनेबाबत कोणतीही माहिती असल्यास पोलिसांना द्यावी.

तर केतनचे दादा देवीचंद अग्रवाल यांनी म्हटलं आहे की,आमच्याच घरच्या लोकांनी आम्हाला धोका दिला आहे. ज्यांना आम्ही अनेक वर्षांपासून ओळखत होतो. त्यांचं म्हणणं आहे की, सिया गोयच्या कुटुंबीयांनी केतन अग्रवालसोबत लग्न करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला होता. या लग्नासाठी जबाबदार असणाऱ्या सर्व लोकांची पोलिसांनी चौकशी करावी,असं आम्हाला वाटतं. 

Advertisement

नक्की वाचा >> Siya Goyal News : केतन अग्रवालच्या हत्येसाठी सिया गोयलने काय काय केलं? संपूर्ण Google हिस्ट्री आली समोर

"आरोपींना फाशीची शिक्षा द्या आणि.."

देवीचंद रडत रडत म्हणाले,पोलिसांनी या लग्नाला जबाबदार असणाऱ्या सर्व लोकांची चौकशी करावी. या दोन्ही आरोपींना (सिया आणि चेतन) यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे.मृत केतनच्या आईनेही न्यायाची आणि दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तसच सिया गोयलच्या कुटुंबीयांवरही कारवाईची मागणी केली आहे.केतनच्या हत्या प्रकरणात सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22) यांना अटक करण्यात आली आहे. 

नक्की वाचा >> Bhandara News: शेकडो वन कर्मचाऱ्यांना 'T-27' ने' अनेकदा दिला गुंगारा, दोघांना ठार केलं, शेवटी उसाच्या शेतात..

पोलिसांच्या माहितीनुसार,सिया आणि केतन (25) यांचं लग्न नोव्हेंबर महिन्यात होणार होतं.पण सियाला हे लग्न मान्य नव्हतं. सिया आणि चेतनने प्रेमात अडथळा ठरत असल्याने केतनची हत्या केली, असा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की,पोलीस या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करत आहे. दोन्ही आरोपींनी 18 जूनच्या आधी आणि घटनेनंतर त्यांच्या मोबाईल फोनमधून चॅट डिलिट केली.