Walmik Karad: 'तर चक्काजाम करणार' कराडच्या पत्नीची थेट धमकी, SIT वर गंभीर आरोप

मंजली कराड यांनी यावेळी SIT वर गंभीर आरोप केले आहेत. SIT प्रमुख बसवराज तेली हे आष्टीचे जावई आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
बीड:

वाल्मिक कराड याचे समर्थक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्याला मोक्का लावण्यात आला आहे. शिवाय संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला बुधवारी एसआयटी कोर्टात सादर करणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर परळीतले वातावरण चांगलेच तापले आहे. वाल्मिक कराडची पत्नी मंजली कराड यांनी थेट इशारा देत जर पतीला बळीचा बकरा केला तर चक्का जाम करू असं म्हटलं आहे. शिवाय या प्रकरणाचा तपास करणाऱ्या SIT वर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. तर सुरेश धस यांना मंत्री होता आले नाही म्हणून ते वंजारी समाजाची माती करायला निघाले आहेत असा आरोप ही त्यांनी केला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मंजली कराड यांनी यावेळी SIT वर गंभीर आरोप केले आहेत. SIT प्रमुख बसवराज तेली हे आष्टीचे जावई आहेत. शितल उगले या IAS ऑफिसर आहेत. त्याही आष्टीच्या आहेत. सुरेश धस यांनी आपली माणसं एसआयटीमध्ये घुसवली आहेत. बसवराज तेली आणि सुरेश धस यांचे सीडीआर तपासावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे. बसवराज तेली यांच्यासह 8 लोक SIT मध्ये बसवले आहेत. त्यांना काढा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसंकडे करते. SIT चे लोक काहीही करून माझ्या नवऱ्याला अडकवू शकतात अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.  SIT चे लोक बदलले नाहीत तर उद्या चक्का जाम करण्याचा इशाराही त्यांनी दिला.    

ट्रेंडिंग बातमी - Walmik Karad : परळीत राडा! कराड समर्थक आक्रमक, एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी माझे पती परळीत नव्हते असंही त्या म्हणाल्या. शिवाय वंजारी समाजाचे दोन नेते मंत्री झाले. हे मराठा समाजाला पाहावलं नाही. सुरेश धस यांनी मंत्री व्हायचे होते. पण त्यांना होता आले नाही त्याचा राग त्यांच्या मनात आहेत. त्यातून ते वंजारी समाजाच्या मंत्र्यांना त्रास देण्यासाठी वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करत आहेत असंही त्या म्हणाल्या. वंजारी समाजाची माती करण्याची धमकी सुरेश धस यांनी दिली होती. याच धसांना माझ्या पतीने विधानसभेला मदत केली होती असा दावा त्यांनी केला. बजरंग सोनावणे यांनी आपल्या पतीला धमकी दिली होती असंही त्या यावेळी म्हणाल्या. 

ट्रेंडिंग बातमी- Walmik Karad: वाल्मिक कराड भोवती फास आवळला, बचावासाठी आई- पत्नी मैदानात, केली मोठी मागणी

त्यामुळे माझी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी आहे. त्यांनी एसआयटीमधले अधिकारे बदलावेत.  SIT चे लोक काहीही करून माझ्या नवऱ्याला अडकवू शकतात. उद्या त्यांना बदलले नाही तर रोडवर चक्का जाम करणार असा इशाराही त्यांनी दिला. ज्यांचा खून झाला त्याचा आणि माझ्या नवऱ्याचा काहीही संबंध नाही असं ही त्या म्हणाल्या. माझ्या नवऱ्यावर चुकीचे गुन्हे दाखल केले तर आम्ही रस्त्यावर उतरू. आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे. तुमच्या राजकारणासाठी माझ्या नवऱ्याचा बळी घेऊ नका असं ही त्या म्हणाल्या.  

Advertisement