वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे; बीडचे आरोपी पुण्यातच का सापडतात ?

संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना बीड पोलिसांनी शनिवारी (04 जानेवारी 2025) अटक केली. या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली हे विशेष.

जाहिरात
Read Time: 3 mins
कराड, घुले आणि सांगळे हे तिघेही पुण्यातच लपले होते
पुणे:

राहुल कुलकर्णी

बीड जिल्ह्यातील (Beed District) दोन प्रमुख गुन्ह्यांमधील तीन मोठे आरोपी हे पुण्यातून अटक करण्यात आले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की,  "उशिरा का होईना गुन्हेगारांना अटक झाली, विशेष म्हणजे आरोपींना पुण्यातून अटक कशी होते? याबद्दल पोलिसांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट काढले पाहिजे." संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case)  आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना बीड पोलिसांनी शनिवारी (04 जानेवारी 2025) अटक केली. (Sudarshan Ghule and Sudhir Sangle Arrested) या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली हे विशेष.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

31 डिसेंबर 2024 रोजी वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला. त्यापूर्वी त्याने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यात त्याने म्हटले होते की, “मी पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण करत आहे आणि माझा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काही सबंध नाही. न्याय देवता जो निर्णय घेईल तो मला मंजूर आहे.”  हे तिघेही आरोपी पुण्यातच कसे सापडले असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करत त्यांनी केलेली हत्या ही संपूर्ण बीड जिल्ह्याला हादरवणारी घटना आहे. यात गुंतलेले आरोपी पुण्यात सापडल्याने 'पुणे' शहरातच हे आरोपी का सापडतात असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. बारकाईने पाहिले असता,या दोन प्रकरणातीलच आरोपी नाही  तर बीड जिल्ह्यातील अनेक गुन्हेगार, कट कारस्थाने आणि खंडणीप्रकरणी गुंतलेले आरोपी पुण्यात आश्रय घेत असल्याचे दिसून येत आहे.  

नक्की वाचा : नाव दाऊदपूर अन् दहशत दाऊदपेक्षाही खतरनाक, 'राख' माफियांच्या गावची गोष्ट

पुण्याचा गुन्हेगारी इतिहास

एकेकाळी सांस्कृतिक, सुशिक्षितांचे मध्यमवर्गीयांचे शांत निवांत पुणे अशी असणारी ओळख, कालांतराने 'भाईं'चे पुणे अशी निर्माण झाली.  80-90 च्या दशकात पुण्यात 'गुन्हेगारी टोळ्या' सक्रीय होत्या. खासकरून दाऊद इब्राहिमची दहशत असताना त्याच्या टोळ्या पुण्यात खंडणी व जमीन व्यवहारांमध्ये सक्रीय होत्या. पुण्यातील वाढत्या शहरीकरणामुळे आणि बाहेरून आलेल्या लोकसंख्येमुळे शहरात अशा टोळ्यांचे जाळे निर्माण झाले होते. आजही, खंडणी, आर्थिक गुन्हे, आणि राजकीय संघर्षांत गुंतलेल्या आरोपींना पुण्यासारख्या मोठ्या शहरात सहज लपता येते. पुणे पोलीस सजग असतात, सतर्क असतात मात्र पुणे इतके विस्तारले आहे की तिथे लपून राहणे फार कठीण जात नाही, ज्यामुळे हे शहर गुन्हेगारांसाठी एक सुरक्षित आश्रयस्थान बनत गेले.

Advertisement

संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींचे पुण्याशी नाते

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली. त्यापूर्वी वाल्मिक कराड हा देखील पुण्यामध्येच शरण आला होता. बीडपेक्षा पुणे हे लपण्यासाठी अधिक सुरक्षित आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या या तीनही आरोपींची बीड जिल्ह्यातील पाळेमुळे पोलिसांनी शोधून काढली होती. ते कुठे लपून बसू शकतात हे देखील बीड पोलिसांना माहिती होते. त्यामुळे या सगळ्या ठिकाणांवर पोलिसांनी आधीपासूनच पाळत ठेवलेली होती. बीड जिल्ह्यात लपून बसणे हे या तिघांसाठी अडचणीचे होते. यामुळे त्यांनी पुण्याची निवड केली होती. 

नक्की वाचा :मुलीला सांभाळा, मला भट्टीमध्ये जाळा... व्हिडिओ करत रिक्षा चालकाने आयुष्य संपवलं

पुण्यात मदत पोहोचवणे सोपे

पुण्यातील गुन्हेगारांच्या जाळ्यामार्फत या आरोपींशी गुपचूप संपर्क साधणे, त्यांना हवी ती मदत पोहचवणे हे सोपे होते. या आरोपींना लपवणं आणि त्यांना हवी तेव्हा, हवी तेवढी आर्थिक मदत पोहचवणं हे देखील पुण्यामध्ये सोपे होते. योगायोग असा की बीडमधील गुन्ह्याचे आरोपी पुण्यात लपून बसले होते आणि या प्रकरणांचा तपास करत असलेल्या सीआयडीचे मुख्यालयही पुण्यातच आहे. वाल्मिक कराड हा याच कार्यालयात शरण आला होता. मात्र घुले आणि सांगळे यांना बीड पोलिसांनी पुण्यातून अटक केली. 

Advertisement

पुण्यात मराठवाड्यातील रहिवाशांची संख्या मोठी

मराठवाड्यातून येऊन पुण्यात स्थायिक झालेल्यांची संख्या हो मोठी आहे. पुण्याध्ये मराठवाड्यातील नातेवाईकांची संख्या ही लक्षणीय असल्याने या नातेसंबंधांचाही गुन्हेगारांना लपण्यासाठी फायदा होतो. अनेकदा पोलिसांना गुन्हेगारांचे पुण्यात कोण नातेवाईक, मित्र किंवा ओळखीचे आहेत ज्यांच्याकडे आरोपी राहू शकतो हे कळत नाही.  याचाही अनेकदा आरोपींना फायदा होतो. असा दावा केला जात आहे की वाल्मिक कराड शरण आला तेव्हा सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे दोघेही पुण्यातच होते.  

Topics mentioned in this article