'आई मी चिप्स चोरले नव्हते', प्रत्येक पालकासाठी धडा आहे 13 वर्षांच्या मुलाचं शेवटचं पत्र

13 वर्षांच्या कृष्णेंदू दासवर एका मिठाईच्या दुकानातून चिप्सचे तीन पॅकेट चोरल्याचा आरोप होता

जाहिरात
Read Time: 3 mins
आई सर्वांसमोर ओरडली म्हणून मुलानं जीव दिला (AI फोटो)
मुंबई:

मुलांना सांभाळणे हे अजिबात सोपे काम नाही. पालकांनी रागावले नाही तर मुले हट्टी होतात आणि जर रागावले तर त्या गोष्टी मनाला लावून घेतात. अशा परिस्थितीत, पालकांनी मुलांशी कसे वागले पाहिजे हा एक मोठा प्रश्न आहे, कारण मुलांचे मन खूप संवेदनशील असते. लहानसहान गोष्टींचा त्यांच्या मनावर खूप खोलवर परिणाम होतो.  त्यांना सर्वांसमोर ओरडले, तर त्यांना अपमान झाल्यासारखे वाटते. यामुळे दुखावून ते अनेकदा चुकीचे पाऊल उचलतात. पश्चिम बंगालमधील पंसकुरा येथे नुकतेच असेच काहीसे घडले आहे. सातवीमध्ये शिकणाऱ्या एका मुलाने आई सर्वांसमोर ओरडली म्हणून आत्महत्या (West Bengal Suicide)  केली आहे. मुलाने एक सुसाईड नोट लिहली आहे. ती मन हेलावून टाकणारी आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मन हेलावून टाकणारी नोट

या मुलाने त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की,  'आई, मी चोरी केली नाही.' मुलाचे हे शेवटचे काळीज हेलवणारे आहे.  आहेत. वास्तविक, रविवारी बकुलदा हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या 13 वर्षांच्या कृष्णेंदू दासवर एका मिठाईच्या दुकानातून चिप्सचे तीन पॅकेट चोरल्याचा आरोप होता. ही मिठाईची दुकान गोसाईंबेर बाजारात एक सिव्हिल वॉलेंटियर शुभांकर दीक्षित यांची होती. शुभांकर दुकानात नसताना या मुलाने तीन चिप्सचे पॅकेट चोरले, असा स्थानिकांचा दावा आहे. 

Advertisement

Advertisement

( नक्की वाचा :  गौतमी पाटीलला बैलासमोर नाचवलं! वैष्णवीला छळणाऱ्या हगवणे कुटुंबीयांचा आणखी एक प्रताप उघड, पाहा Video )

चोरीच्या आरोपावरून मुलाला मारहाण

दुकानदाराने मुलाला दुकानापासून थोड्या अंतरावर चिप्सच्या पॅकेटसोबत पाहिले आणि तो त्याच्यामागे धावला. त्याच्या चोरीबद्दल चौकशी केली गेली. त्याने दुकानदाराला 5 रुपयांप्रमाणे तीन चिप्सच्या पॅकेटचे 20 रुपये दिले. यानंतरही दुकानदार ऐकला नाही. तो पैसे परत देण्याच्या बहाण्याने मुलाला पुन्हा दुकानात घेऊन गेला आणि त्याला मारहाण केली. इतकेच नाही, तर दुकानदाराने मुलाला सार्वजनिकपणे माफी मागण्यासही लावले.

Advertisement

आई सर्वांसमोर ओरडली....

मुलासोबत हे सर्व घडले होते, तेवढ्यात त्याच्या आईला याबद्दल कळताच तिने त्याला पुन्हा त्याच मिठाईच्या दुकानात नेले आणि सर्वांसमोर ओरडले. या गोष्टीने 13 वर्षांचा मुलगा इतका दुखावला गेला की, घरी परतताच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत त्याला तातडीने तामलुक मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले, जिथे गुरुवारी त्याचा मृत्यू झाला.

( नक्की वाचा : ग्रेटर नोएडामध्ये Gay App गँगनं केली आणखी एक शिकार, वाचा कसं विणलं जातंय तरुणांभोवती जाळं )

आईच्या ओरडल्याने धक्का 

पीडित कुटुंबाचा आरोप आहे की, मिठाई दुकानदाराच्या वर्तनामुळे मुलाला असे भयानक पाऊल उचलण्यास भाग पाडले गेले. तेव्हापासून दुकानदार फरार आहे. आईने सार्वजनिकपणे ओरडल्याचाही मुलाच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. आईच्या ओरडण्याने मुलगा खूप दुःखी होता, असंही या कुटुंबाने सांगितलं.

पालकांनो, या गोष्टी लक्षात ठेवा 

या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेमधून सर्व पालकांनी धडा घेतला पाहिजे. कळत्या वयाची होत असताना मुलं खूप संवेदनशील असतात. त्यांना सर्वांसमोर ओरडलं तर ते त्याला स्वत:चा अपमान समजतात. 
 अनेकदा ते असे पाऊल उचलतात, ज्यानंतर पालकांच्या हातात पश्चाताप करण्याशिव्ाय दुसरं काहीच शिल्लक नसतं. त्यामुळे पालकांनी मुलांना सांभाळताना खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. त्यांना समजावून सांगावे, सर्वांसमोर ओरडू नका. ओरडायचे असल्यास, ते एकटे असताना ओरडा, जेणेकरून त्यांना अपमानास्पद वाटणार नाही.
 

Topics mentioned in this article