जाहिरात

ग्रेटर नोएडामध्ये Gay App गँगनं केली आणखी एक शिकार, वाचा कसं विणलं जातंय तरुणांभोवती जाळं

Gay Datting App Scam : ग्रेटर नोएडातील दादरी पोलिसांनी डेटिंग ॲप वापरणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. सं

ग्रेटर नोएडामध्ये Gay App गँगनं केली आणखी एक शिकार, वाचा कसं विणलं जातंय तरुणांभोवती जाळं
मुंबई:

Gay Datting App Scam : ग्रेटर नोएडातील दादरी पोलिसांनी डेटिंग ॲप वापरणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. संपूर्ण एनसीआरमध्ये सक्रिय असलेल्या या टोळीने आणखी एका तरुणाला त्यांचा बळी बनवले होते. ही टोळी गे ॲपच्या माध्यमातून तरुणांना फसवून ब्लॅकमेल करत पैसे लुटत असे. दादरी जीटी रोडवरून या टोळीच्या म्होरक्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने अनेक गुन्हे केले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कसं चालत होतं काम?

दिल्ली-एनसीआरमध्ये गे टोळीचा हा प्रकार बराच जुना आहे.  या टोळीने 2020 मधील पाच महिन्यांत सुमारे 150 जणांना लोकांना लक्ष्य केले होते. या टोळीची कार्यपद्धती अत्यंत चाणाक्ष आहे. गे डेटिंग ॲपवर त्यांचे सदस्य बनावट प्रोफाइल तयार करतात आणि मग शिकार शोधतात. 

दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक लोक त्यांच्या जाळ्यात अडकतात. ॲपवर खासगी क्षणांचे फोटो मिळवले जातात आणि त्यानंतर ब्लॅकमेलिंगचा सिलसिला सुरू होतो. पोलीस नोंदीनुसार, या टोळीच्या जाळ्यात अडकलेले लोक चांगल्या कंपन्यांमध्ये काम करणारे आणि विवाहित असतात.

Dating Apps नको रे बाबा! Single तरुणांमध्ये काय आहे नवा ट्रेंड? संशोधनातून कारण उघड

( नक्की वाचा :  Dating Apps नको रे बाबा! Single तरुणांमध्ये काय आहे नवा ट्रेंड? संशोधनातून कारण उघड )

समाजात आपली बदनामी होऊ नये या भीतीने ते शांतपणे सर्व सहन करतात आणि पोलिसांकडे कमीच जातात. टोळीचा म्होरक्या त्यांना निर्जन ठिकाणी बोलावतो आणि त्यांच्या कार्डांमधून पैसे काढले जातात. काहींच्या बाबतीत हे सत्र चालूच राहते. 

गुरुग्राममध्ये पोलिसांकडे 2020 मध्ये  एक विचित्र प्रकरण आले. एका तरुणाने पोलिसांना सांगितले की काही तरुणांनी त्याचा फोन आणि पैसे लुटले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, पण काहीही सापडले नाही. तरुणाची कसून चौकशी केल्यावर त्याने सत्य सांगितले. प्रकरण खरं तर गे डेटिंग ॲपवरून झालेल्या लुटीचे होते.

ग्रेटर नोएडामध्ये तरुणाला कसे लुटले?

ग्रेटर नोएडाच्या या नवीन प्रकरणात पोलिसांच्या हाती लागलेले दक्ष उर्फ कप्तान, भूपेंद्र उर्फ भूप्पी, जय राघव, हनी हे या टोळीचे सदस्य आहेत. अतिरिक्त डीसीपी ग्रेटर नोएडा यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात 17 एप्रिल रोजी एका व्यक्तीला स्टेलर जिमखाना सोसायटी नॉलेज पार्कजवळ या टोळीने लुटले होते. 

तरुणाला कारमध्ये बसवून त्याच्या फोनवरून 79 हजार रुपये दादरी येथील एका दुकानाच्या बारकोडवर ट्रान्सफर करण्यात आले. त्या पैशातून 64 हजारांचा आयफोन 15 प्रो खरेदी केला आणि उर्वरित 15 हजार रुपये रोख घेतले. साडे चोवीस हजार रुपये एका कॅफेच्या बारकोडवर जमा करून नंतर कॅफेतून रोख रक्कम काढली.

आई की हैवान? अडीच वर्षांच्या चिमुरडीवर जन्मदातीच्या संमतीनंच झाला भयंकर अत्याचार, मुंबईतील भयंकर घटना!

( नक्की वाचा :  आई की हैवान? अडीच वर्षांच्या चिमुरडीवर जन्मदातीच्या संमतीनंच झाला भयंकर अत्याचार, मुंबईतील भयंकर घटना! )

असे आले जाळ्यात

या आरोपींना जीटी रोडवरील चिटहैरा स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून एक अवैध पिस्तूल, चाकू आणि गुन्ह्यात वापरलेला आयफोन-15 प्रो जप्त करण्यात आला आहे. या आरोपींनी काही दिवसांपूर्वी हापुडमध्येही अशाच प्रकारे एका व्यक्तीला बोलावून त्याच्याकडून 25 हजार रुपये आणि सोन्याची चेन लुटली होती. या टोळीने आणखीही अनेक गुन्हे केले आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com