
'ऑपरेशन सिंदूर' द्वारे पाकिस्तानला लष्करी भाषेत सडेतोड उत्तर दिल्यानंतर, भारताने आता देशात पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांना अटक करण्याचा धडाका सुरु केला आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे येथील स्टेट स्पेशल ऑपरेशन्स सेल (SSOC) ने "जान महल" नावाचे यूट्यूब चॅनेल चालवणाऱ्या जसबीर सिंगच्या (Jasbir Singh) हालचालींची सखोल चौकशी सुरू केली आहे. जसबीर कथितरित्या यापूर्वीच पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या (Jyoti Malhotra) संपर्कात होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहे जसबीर सिंग?
जसबीर सिंग हा पंजाबमधील रूपनगर जिल्ह्यातील महलां गावाचा रहिवासी असून 'जान महल' नावाचे यूट्यूब चॅनेल चालवतो. या चॅनेलवर त्याचे 1.1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि त्याने 2.9 हजार व्हिडिओ अपलोड केले आहेत.
पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे की, चस्टेट स्पेशल ऑपरेशन्स सेल, मोहालीने रूपनगरच्या महलां गावातील रहिवासी जसबीर सिंगशी संबंधित एका महत्त्वाच्या गुप्तहेर नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे.
जसबीर सिंग 'जान महल' नावाचे यूट्यूब चॅनेल चालवतो. तो पीओ शाकीर उर्फ जट रंधावाशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे. हा दहशतवाद-समर्थित गुप्तहेर नेटवर्कचा भाग आहे. जसबीरचे हरियाणाची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा (हेरगिरीच्या आरोपाखाली अटक) तसेच एहसान-उर-रहीम उर्फ दानिश, एक पाकिस्तानी नागरिक आणि पाकिस्तानी उच्चायुक्तालयातून हकालपट्टी केलेल्या अधिकाऱ्याशीही जवळचे संबंध आहेत.'
( नक्की वाचा : ज्योती मल्होत्राचा थेट होता ISI शी संपर्क, पाकिस्तानात AK 47 घेऊन... नव्या Video मधून अनेक रहस्य उघड )
तीन वेळा पाकिस्तान दौरा
डीजीपी गौरव यादव यांनी सांगितले आहे की, 'चौकशीत असे आढळले आहे की, जसबीरने दानिशच्या आमंत्रणावर दिल्लीतील पाकिस्तान राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात भाग घेतला होता. तिथे पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि व्लॉगर्सना भेट दिली होती. त्याने तीन वेळा (2020, 2021, 2024) पाकिस्तानचा प्रवास केला. त्याच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये पाकिस्तानचे अनेक नंबर होते, ज्यांची सखोल फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.
डीजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, जसबीरवर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर स्वतःला वाचवण्यासाठी या पीओसोबतच्या आपल्या संवादाचे सर्व पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. त्याच्याविरुद्ध मोहालीत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आता त्याच्याविरुद्ध व्यापक गुप्तहेर-दहशतवादी नेटवर्क नष्ट करण्यासाठी आणि त्याच्या सर्व साथीदारांना ओळखण्यासाठी तपास सुरू आहे.
ज्योती आणि जसबीर मित्र
जसबीर हा पाकिस्तानासाठी हेरगिरी केल्यानं अटकेत अललेली यूट्यूब ज्योती मल्होत्राच्या जवळचा होता. हे त्यानं केलेल्या व्हिडिओतूनच हे स्पष्ट झाले आहे. इतकंच नाही तर ज्योतीने पाकिस्तानच्या पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांची भेट घेतली होती, तेव्हा त्या व्हिडिओचे रेकॉर्डिंगही कथितरित्या जसबीरने केले होते, हा व्हिडिओ त्याच्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे. तो ज्योतीच्या व्लॉगिंग कौशल्याचाही फॅन आहे. एका व्हिडिओमध्ये त्याने म्हटले होते की, व्लॉगिंग शिकायचे असेल तर ते ज्योतीकडून शिकावे. त्याच्या एका व्हिडिओमध्ये ज्योती लाहोरमध्ये नाचताना दिसत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world