बिश्नोई गँगचा सूत्रधार कोण? सातासमुद्रापार बसून कशी चालवली जाते गँग?

अमेरिकेत असलेला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई गँग ऑपरेट करतो. अनमोलचं नाव सलमानच्या घरावर गोळीबार प्रकरणात आलं होतं. अनमोल हा सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटर्सशी सिग्नल अॅपच्या माध्यमातून संवाद साधत होता.

जाहिरात
Read Time: 3 mins

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेता बाबा सिद्दीकी यांनी शनिवारी रात्री गोळी झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींचा बिश्नोई गँगशी संबंध असल्याचा दावा केला जात आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने अनेक वेळा सलमान खानला धमकी दिली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शूटर्सनी दोन वेळा सलमान खानच्या घराची रेकी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत बसून तीन वॉन्टेंड गँगस्टर बिश्नोई गँग चालवत आहे. 

बिश्नोई गँगने पहिल्यांदा रेडी चित्रपटादरम्यान, दुसऱ्यांदा पनवेल फार्म हाऊसची रेकी केली. तर तर तिसऱ्यांदा सलमान खानच्या घरावर गोळीबार घडवून आणला होता. सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या एका शूटरचा मुंबईत पोलीस स्टेशनमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकीच्या हत्येचा प्लान आखला होता, अशी माहिती समोर येत आहे. 

अनमोल बिश्नोई करतो गँग ऑपरेट

अमेरिकेत असलेला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई गँग ऑपरेट करतो. अनमोलचं नाव सलमानच्या घरावर गोळीबार प्रकरणात आलं होतं. अनमोल हा सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटर्सशी सिग्नल अॅपच्या माध्यमातून संवाद साधत होता. गायक मुसेवाला प्रकरणात हा प्रमुख आरोपी आहे. लॉरेन्स बिश्नोईनंतर अनमोल बिश्नोईकडे गँगची संपूर्ण जबाबदारी आहे. 

(नक्की वाचा- Baba Siddique बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी कितीची सुपारी? प्रत्येकाला मिळणार होते...)

गोल्डी ब्रार बिश्नोई गँगचा कमांडर

वॉन्टेंड गँगस्टर आणि दहशतवादी गोल्डी ब्रारदेखील लॉरेन्स बिश्नोई गँगचा कमांडर आहे. तो देखील अमेरिकेत बसून काम करतो. सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणात त्याचं नाव समोर आलं होतं. सलमान खानच्या प्रकरणातही गोल्डीची बरीच चर्चा होती. या कुख्यात आरोपीवर सरकारने अनेक बक्षीसे ठेवली आहेत. गोल्डी ब्रार याला महाविद्यालयीन काळापासून लॉरेन्सची स्टाइल आवडत होती. भावाची हत्या झाल्यानंतर तो बिश्नोईच्या गँगमध्ये सामील झाला. 

रोहित गोदाराने सलमानच्या निकटवर्तीयांना दिली होती धमकी

राजस्थानचा कुख्यात गँगस्टर रोहित गोदारा हा सध्या अमेरिकेत आहे. अनमोल आणि गोल्डी ब्रारसह रोहितदेखील बिश्नोई गँग चालवतो. सलमान खानच्या घरावर जेव्हा गोळीबार झाला तेव्हा त्यानेच सोशल मीडियावर पोस्ट करत जबाबदारी घेतली होती. एक मोबाइल टेक्नीशियन ते गँगस्टर असा धक्कादायक प्रवास रोहितचा आहे. गँगस्टर झाल्यानंतर त्याचा कुटुंबाशी काहीही संपर्क झाला नाही. भारतात अनेक गुन्हे केल्यानंतर परदेशात वास्तव्यास असलेला रोहित गोदार तेथूनच आपल्या गटाकडून काम करवून घेत आहे. 

(नक्की वाचा-  Baba Siddiqui News : 48 वर्षे काँग्रेसमध्ये, 8 महिन्यांपूर्वी अजित पवार गटात प्रवेश; कोण होते बाबा सिद्दीकी?)

या मोठ्या घटनांमध्ये लॉरेन्स बिश्नोईचं नाव पुढे आले

  • पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी घेतली होती.
  • सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातही या टोळीचे नाव पुढे आले होते.
  • करणी सेनेचे नेते सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी या टोळीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. 
  • पंजाबी गायक एपी धिल्लोन आणि गिप्पी ग्रेवाल यांच्या कॅनडातील घरावर झालेल्या गोळीबारात लॉरेन्स बिश्नोईचे नाव पुढे आले होते.
  • अलीकडेच दिल्लीतील नादिर हत्याकांडातही लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव पुढे आले होते.
Topics mentioned in this article