Who is Shivraj Motegaonkar : National Eligibility Entrance Test (NEET) युजी पेपर लीक प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सीबीआयने लातूरमधून कोचिंग संचालक शिवराज मोटेगावकर याला अटक केली आहे. यापूर्वीही सीबीआयने नीट पेपर लीक प्रकरणात अनेकांना अटक केली आहे. मात्र या प्रकरणात शिवराज मोटेगावकराची अटक मोठं यश मानलं जात आहे.
लातूरमध्ये RCC नावाची कोचिंग संस्था चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर याचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो संस्थेतील विद्यार्थ्यांना मॉक टेस्टमध्ये विचारलेले किती प्रश्न नीटच्या परीक्षेत विचारण्यात आले होते, याबाबत अधिक माहिती घेत होता. यादरम्यान केलेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. या तपासात समोर आलं की, मॉक टेस्टमध्ये विचारण्यात आलेले केमिस्ट्रीतील ४२ प्रश्न नीटमध्ये तंतोतंत विचारण्यात आले होते. तेव्हापासून तो सीबीआयच्या रडारवर होता.
शिवराज RCC च्या नावाने लातूरमध्ये कोचिंग संस्था...
नीट पेपर लीक प्रकरणात अटक झालेला शिवराज मोटेगावकर महाराष्ट्रातील कोचिंग इंडस्ट्रीतील एक मोठं ब्रँड आहे. मोटेगावकर लातूर आणि आजूबाजूच्या परिसरात आरसीसीच्या नावाने कोचिंग संस्था चालवत होते. रेणुकाई करिअर सेंटर म्हणजेच RCC. दोन दशकांपूर्वी त्याचा हा प्रवास सुरू झाला होता, आता आरसीसी लातूरमध्ये एक मोठी कोचिंग संस्था म्हणून समोर आली आहे.
RCC नीट पुनर्परीक्षेची सुरू होती तयारी...
नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयने आरसीसीचेचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर याला अटक केलं आहे.
'M सर' नावाने लोकप्रिय आहेत शिवराज, कोचिंगचा १०० कोटींचा टर्नओव्हर
RCC कोचिंगचे संचालक शिवराज मोटेगावकर आपल्या इंडस्ट्री आणि विद्यार्थ्यांमध्ये 'M सर' नावाने लोकप्रिय आहेत. शिवराजला अधिकांश लोक याच नावाने ओळखतात. शिवराजची कोचिंग संस्था लातूरच्या अर्थव्यवस्थेचा मजबूत आधार मानला जातो. सद्यस्थितीत आरसीसीचा टर्नओव्हर १०० कोटींच्या घरात आहे.
एकेकाळी सायकलवर जाऊन ट्यूशनवर जाऊन शिकवणी घ्यायचा शिवराज
लातूरमध्ये १०० कोटींचा टर्नओव्हर असलेली कोचिंग संस्था आरसीसीचा संचालक शिवराज मोटेगावकर याचा जन्म लातूरच्या एका शेतकरी कुटुंबात झाला. शिवराजने आपल्या करिअरची सुरुवात एक ट्यूशन टीचर म्हणून केली होती. विज्ञानाचे प्राध्यापक शिवराज सायकलवरुन लातूरमधील विद्यार्थ्यांच्या घराघरात जात होते. ते विद्यार्थ्यांच्या घरात जाऊन त्यांना विज्ञानाचे धडे देत होते.
भाड्याच्या घरातून सुरू केला कोचिंग क्लास...
शिवराज यानंतर कोचिंग क्लास सुरू केला. साधारण १९९९ मध्ये १० विद्यार्थ्यांसह एका भाड्याच्या घरात कोचिंग क्लास सुरू केला होता आणि केमिस्ट्रीचे धडे देणं सुरू केलं. सुरुवातीला शिवराज केवळ अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थी आणि प्रवेश परीक्षेची तयारी करवून घेत होते. हळूहळू विद्यार्थ्यांच्या अनेक बॅचेस सुरू झाले.
JEE_NEET कोचिंगचा ब्रँड ठरला RCC, ४० हजारांहून अधिक विद्यार्थी
दोन दशकांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या या प्रवासात शिवराजचा कोचिंग क्लास RCC ने लातूरसह पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर आणि कोल्हापूर सारख्या शहरांमध्ये विस्तार केला. सद्यस्थितीत आरसीसीमध्ये ४० हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. शिवराजच्या कोचिंग संस्था महाराष्ट्रात जेईई-नीटसह CET च्या कोचिंगचा मुख्य ब्रँड आहे. या परीक्षेची तयारी करणारे हजारो विद्यार्थी येथे कोचिंगसाठी येतात.
केमिस्ट्रीमध्ये Msc गोल्ड मेडलिस्ट आहे शिवराज...
शिवराज मोटेगावकरच्या एज्युकेशन डिग्रीबाबत संस्थेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, त्याने केमिस्ट्रीमधून Msc चं शिक्षण घेतलं आहे. त्याने पदव्युत्तर पदवी घेतली असून त्यात गोल्ड मेडल पटकावलं आहे. शिवराज हे विद्यार्थ्यांमध्ये सोप्या भाषेत केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्र शिकवणारे शिक्षक म्हणून ओळखले जातात