पतीसोबत भांडण झाल्यानंतर पत्नीनं केलं भयंकर कृत्य, अख्ख कुटुंब हादरलं! वादाचं कारण वाचून धक्काच बसेल

तीन दिवसांचे उरलेले सांबर सतत जेवणात वाढल्याने पती-पत्नीत घरगुती वाद झाला. या वादातून 27 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Husband And Wife Clash Crime News

Husband And Wife Clash :  तीन दिवसांचे उरलेले सांबर सतत जेवणात वाढल्याने पती-पत्नीत घरगुती वाद झाला. या वादातून 27 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. काव्या असं मृत महिलेचं नाव आहे.  पतीसोबत झालेल्या वादानंतर पत्नीनं कीटकनाशकाचं सेवन करून स्वत:चं जीवन संपवलं.ही धक्कादायक घटना बंगळुरुत घडली. काव्याने पेस्टीसाईड प्राशन करून जीवन संपवल्यानं संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. 

काव्याचं रंगस्वामी यांच्याशी पाच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं आणि..

याबाबत सविस्तर वृत्त असं की, तीन दिवसांचं उरलेलं सांबर जेवणात सतत वाढल्याने कौटुंबिक वाद निर्माण झाला. पती-पत्नीत झालेल्या या वादामुळे पत्नीनं आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं. काव्याचं पती रंगस्वामी यांच्याशी पाच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं आणि ती चार वर्षांच्या मुलाची आई होती. प्राथमिक माहितीनुसार,तीन दिवसांपूर्वी तयार केलेले  सांबर तिने पुन्हा गरम करून वाढल्यामुळे दाम्पत्यामध्ये वाद झाला. हा वाद इतका चिघळला की पतीने पत्नीचा अपमान केला. तसच तिच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला, असा आरोप आहे. 

नक्की वाचा >> Beed News : बीड बस स्थानक परिसर हादरलं..रात्री 2 वाजता घडली भयंकर घटना! संपूर्ण शहरात पोलीस अलर्ट मोडवर

पतीसोबत वाद झाल्यानंतर पत्नी काव्यानं कृषी उपयोगासाठी ठेवलेले कीटकनाशक प्राशन केलं आणि स्वत:चं जीवन संपवलं. काव्याला उलट्या झाल्यानंतर तिला अस्वस्थ वाटत असल्याचं तिच्या कुटुंबियांच्या लक्षात आलं. पोलिसांच्या माहितीनुसार,काव्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.काव्याचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.