बहिणीला लग्नात सोन्याची अंगठी देण्याची भावाची इच्छा अपूर्ण; रागावलेल्या पत्नीने जीवच घेतला!

बहिणीला तिच्या लग्नात सोन्याची रिंग आणि टीव्ही देण्याचं प्लानिंग करणं भावाला महागात पडलं आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
लखनऊ:

उत्तर प्रदेशातील बाराबंकीमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पतीची हत्या घडवून आणल्याचा प्रकार घडला आहे. या व्यक्तीला आपल्या बहिणीच्या लग्नासाठी चांगलं गिफ्ट द्यायचं होतं. यातूनच दोघांमध्ये झालेल्या वादातून महिलेने पतीच्या हत्येचा कट रचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  बहिणीला तिच्या लग्नात सोन्याची रिंग आणि टीव्ही देण्याचं प्लानिंग करणं भावाला महागात पडलं आहे. 

मृत तरूणाचं नाव चंद्र प्रकाश मिश्रा असून पत्नीचं नाव छवि आहे.भाऊ चंद्रप्रकाशला बहिणीच्या लग्नासाठी चांगलं गिफ्ट द्यायचं होतं. यावरुन चंद्रप्रकाश याचे पत्नी छविसोबत वाद झाले. पाहता पाहता हा वाद हत्येत बदलला. छविच्या कुटुंबीयांनी तिच्या पतीला इतकं मारलं की, यात त्याचा मृत्यू झाला. 

चंद्रप्रकाश मिश्रा याच्या बहिणीचं येत्या दोन दिवसात 26 एप्रिल रोजी लग्न होणार होतं. त्याला बहिणीला सोन्याची अंगठी आणि टीव्ही गिफ्ट द्यायचा होता. चंद्रप्रकाशच्या पत्नीला याचा खूप राग आला. यावरुन दोघांमध्ये वादही झाला. पत्नीने चंद्रप्रकाश याला धडा शिकवण्यासाठी आपल्या भावांना बोलावलं. छविच्या भावांनी तिच्या पतीवर तब्बल एक तासापर्यंत काठीने मारहाण केली. अर्धमेल्या अवस्थेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

नक्की वाचा - बाबा चिडले म्हणून दोन्ही मुलांनी घर सोडलं; चिंताग्रस्त पालकांची पोलीस ठाण्यात धाव

हत्येच्या आरोपाखाली पाच जणांना अटक
या घटनेनंतर पोलिसांनी छवि आणि तिच्या भावांसह पाच जणांना अटक केली आहे. सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. इतक्या छोट्याशा कारणावरुन पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून हत्या करण्यात आली, ही घटना हैराण करणारी आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.  

Advertisement