देवा राखुंडे, प्रतिनिधी
1 ऑगस्ट रोजी बारामती-इंदापूर मार्गावर काटेवाडी येथे चालू बसमध्ये एका व्यक्तीने दुसऱ्या प्रवाशावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली होती. यावेळी बसमधील एक महिला या धक्क्याने बेशुद्ध पडली होती. तिच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारदरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. वर्षा रामचंद्र भोसले असं मृत महिलेचे नावं आहे.
या हल्ल्याप्रकरणी आरोपी अविनाश सगर (वय 22) वर्षे याला पोलिसांनी अटक केली आहे. सगर याने अचानक कोयता काढून पवन गायकवाड यांच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर सगर याने स्वतःवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रसंगावधान दाखवत वालचंद नगर पोलिसांनी या आरोपीला झडप घालून ताब्यात घेतले होते.
नक्की वाचा - लेकीच्या जबाबामुळे आईचं बिंग फुटलं; पतीच्या हत्येचा भयंकर प्लान आखणारा सौंदर्याचा क्रूर चेहरा
या घटनेमुळे बसमधील वर्षा रामचंद्र भोसले ही महिला प्रवासी धक्क्याने बेशुद्ध पडली. तिच्यावर बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र नंतर सदर महिलेला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या महिलेचा मृत्यू झाला. बस क्र. एमएच 14 बीटी 3506 मध्ये 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9.45 च्या सुमारास काटेवाडी येथील उड्डाणपुलाजवळ ही घटना घडली होती. यावेळी बसमध्ये सुमारे 60 प्रवासी प्रवास करत होते.