Akola News : 'ती दिवस मोजत राहिली', पतीच्या दुराव्यातून मीरेचा काळीज पिळवटून टाकणारा अंत

या घटनेमुळे एका निरागस मुलाच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola family dispute wife death : शहरातील शिवापुर म्हाडा कॉलनी परिसरात पती-पत्नीतील वादातून एका 37 वर्षीय महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव मीरा मुरलीधर मानकर (वय 37) असे असून ती एका मुलांची आई होती.

अन् पतीने घर सोडले, एका मुलाच्या आईने विहिरीत घेतली उडी

अकोला शहरातील खदान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मीराचा तिच्या पती मुरलीधर मानकर यांच्यासोबत काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मुरलीधर यांनी घर सोडले होते, याबाबतची तक्रारदेखील खदान पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या सततच्या कलहातून त्रस्त झाल्यानेच मीराने आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मीराच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याची चर्चा आहे. त्यातून पत्नी मीराने टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र दोघांच्या अंतर्गत कलहामुळे एका निरागस दहा-बारा वर्षांच्या मुलाच्या 37 वर्षीय मीरा नावाच्या आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली का? इतर कारणामुळे आत्महत्या केली? अशा चर्चेला परिसरात आता उधाण आलंय. याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

नक्की वाचा - Delhi News : घरी जात असताना अचानक सळई डोक्यात घुसली, 5 वर्षांच्या मुलीच्या मृत्यूने सारेच सुन्न

घटनास्थळी पोलीस दाखल, मृतदेहाचा केला पंचनामा

यादरम्यान, मीराचा मृतदेह शिवापुर म्हाडा कॉलनीतील विहिरीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनोज केदारे आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान घटनास्थळी महिलेची चप्पल, मोबाईल फोन आणि इतर साहित्य आढळले. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

या घटनेमुळे एका निरागस मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कौटुंबिक मतभेदांनी शेवटी जीवघेणे रूप घेतल्याने समाजातही संतापाची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Advertisement
Topics mentioned in this article