Shocking news: केंद्रीय राज्यमंत्रीपदाचे आमिष! 20 कोटी 50 लाखांची मागणी, टोकन म्हणून 1 कोटी, भाजपच्या...

या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी लौकिक फुलकर, गणेश राठोड आणि विश्वजीत राठोड या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
AI Image
यवतमाळ:

प्रतिक राठोड 

Yavatmal News: एक धक्कादायक आणि तेवढीच गंभीर घटना समोर आली आहे. सध्या राजकारणात पदाला महत्व आहे. ते पद मिळण्यासाठी काही जण वाट्टेल ती किंमत मोजायला तयार असतात. अशा लोकांना गंडवणारी टोळी ही आता देशात सक्रीय झालीय की काय असेच या घटनेवरून दिसून येत आहे. ही घटना यवतमाळ मध्ये घडली आहे. काही भामट्यांनी केंद्रात राज्यमंत्री दर्जाचे पद मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यातून त्यांनी तब्बल 20 कोटी 50 लाख रूपयांची मागणी केली. ऐवढेच नाही तर टोकन म्हणून 1 कोटी रुपये ही मागितले. समोरच्यांवर विश्वास ठेवून भाजपच्या जिल्हा समन्वयक असलेल्या नेत्याने 50 हजार देवू ही केले. पण आपली फसवणूक होत आहे हे लक्षात आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचे बिंग फुटले. 

नितीन भुतडा हे भाजप जिल्हा समन्वयक आहेत. त्यांना लौकिक फुलकर, गणेश राठोड आणि विश्वजीत राठोड या तिघांनी संपर्क केला होता. त्यात त्यांनी केंद्रात आपली वट असल्याचं सांगितलं. शिवाय केंद्र सरकारकडून राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणारी विवीध महामंडळ भरली जाणार आहेत असं दाखवलं. मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची देवाण घेवाण करावी लागेल असं त्यांनी भुतडा यांना सांगितलं. जितकं मोठं महामंडळ तेवढी रक्कम जास्त मोजावी लागेल असं ही या तिघांनी सांगितलं. शिवाय काही उदाहरणं ही त्यांनी दिली. मग मध्य प्रदेशातून कोण इच्छुक आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांनी यासाठी किती पैसे दिले आहेत याची यादीच त्यांनी भुतडा यांना सांगितली. 

Advertisement

नक्की वाचा - Munna zingada : मुन्ना झिंगाडा! डी कंपनीचा चरसी अन् दहशतवाद्यांचा हँडलर, जाणून घ्या झिंगाडाचा खतरनाक प्रवास

ते ऐवढ्यावर थांबले नाहीत. एका एका पदासाठी 15 कोटी पासून 20 कोटी रूपये देण्याची तयारी ही काहींनी दाखवली आहे. काहींना टोकन म्हणून तीन ते पाच कोटी द्यावे लागणार आहेत. हे पैसे ही काही जणांनी तयार ठेवल्याचं हे तिघे जणा सांगत होते. शिवाय काहींचे पैसे रेडी आहेत पण त्यांना केंद्राकडून ग्रिन सिग्नल नाही अशी पट्टी ही त्यांनी भुतडा यांना पडवल्याचं व्हायरल ऑडीओमधून दिसत आहे. एकूण 42 महामंडळ आहे. ती पदे भरायची आहे असं ही सांगितलं गेलं. ते जे काही सांगत होते त्यावर भुतडा यांनी ही विश्वास ठेवला. त्यातून त्यांनी 50 हजार रूपये ही देवू केले. पण काही तरी गडबड असल्याचं लक्षात येत त्यांनी सापळा रचण्याचं ठरवलं. 

नक्की वाचा -  Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांचे मध्यरात्री उपोषण मागे, रात्री 1.15 वाजता अंतरवालीत काय घडलं?

त्यानुसार भुतडा यांनी माजी मंत्री मदन येरावार यांच्या कार्यालयात स्पाय वाय-फाय मेटल क्लॉक बसवून आरोपींच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग केले. त्यात ते पैशांची देवणा घेवाण पासून किती पैसे द्यावे लागती याची माहिती देत होते. शेवाय ते भुतडा यांनी पैसे देणे गरजेचे का आहे हे पडवून देत होते. हे सर्व संभाषण रेकॉर्ड झाले आहे. हाच पुरावा महत्वाचा ठरला. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी लौकिक फुलकर, गणेश राठोड आणि विश्वजीत राठोड या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिवाय पुढील तपास ही सुरू केला आहे.