शेजारी शेजारी राहाणाऱ्या दोन बायकांची भांडणं होती. त्यातील एका बाईच्या पतीला त्याचा राग होता. शिवाय तो ऑनलाईन जुगाराच्या नादी ही लागला होता. त्यातून त्याने एक भयंकर कट रचला. तो ज्या वेळी उघड झाला त्यावेळी सर्वांच्यात पाया खालची वाळू सरकली. सर्व जण हैराण झाले. एखादा व्यक्ती कशा प्रकारे विचार करू शकतो आणि किती टोकाचं पाऊल उचलू शकतो याचा विचार करून पोलीस ही आवाक झाले. ही घटना नवी मुंबईतल्या तळोजामध्ये घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही घटना नवी मुंबईतल्या तळोजा इथं घडली आहे. मोहम्मद अन्सारी हा तळोजा इथं राहातो. त्याचा शेजारी अमरिश शर्मा यांचे कुटुंब राहाते. अन्सारी याची पत्नी आणि शर्मा यांची पत्नी यांची सतत मुलांच्या खेळण्यावरून वाद होत होते. सततच्या वादामुळे अन्सारी हा शर्मा कुटुंबीयांवर राग ठेवून होता. शिवाय त्याला ऑनलाईन मोबाईल गेमचा नाद होता. त्यात त्याने जवळपास 40 हजार पेक्षा जास्त रुपये गमावले होते. त्यामुळे त्या टेन्शनमध्ये तो होता. अशा वेळी त्याच्या डोक्यात एक भयंकर गोष्ट शिरली.
त्याने शेजारी अमरिश शर्माच्या लहान मुलीला किडनॅप करण्याचं ठरवलं. शिवाय त्यातून खंडणी मागायची आणि पैसे मिळवायचे असा त्याचा प्लॅन होता. त्यातून त्याने त्या मुलीला किडनॅप केल. तो ऐवढ्यावरच थांबला नाही. त्याने त्या चिमुकलीचा खून केला. तिचा मृतदेह एका बॅगेत भरला. ही बॅग त्याला बाहेर घेवून जायची होती. पण संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याने त्या चिमुकलीच्या घरातच शौचालयावर तिचा मृतदेह असलेली बॅग ठेवून दिली. नंतर त्याने खंडणीची मागणी ही केली.
मुलगी गायब झाल्याने अमरिश शर्मा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर मुलीची हत्या झाल्याचे समोर आले. पोलिसांनी आपली यंत्रणा कामाला लावली. त्यातून त्यांनी संशयित महम्मद अन्सारी याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने आपणच खून केला असल्याची कबूली दिली. शिवाय हे का केले याचे ही कारण सांगितलं. शर्मा कुटुंबावर असलेला राग आणि जुगार खेळण्यासाठी पैशाची चणचण यामुळे त्याने हे विकृत कृत्य केल्याचे स्पष्ट केले.