
एका वॉशिंग मशीनमुळे एक बलात्कारी गजाआड गेला आहे. असं तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. एका बॉशिंग मशीनमुळे हा बलात्कारी गजाआड गेला आहे. त्याने आपल्या गर्लफ्रेंडवर जबरदस्तीने एक नाही तर सहा वेळी बलात्कार केला. शिवाय तिचा व्हिडीओ काढून तो व्हायरल करेन असं सांगत तिला धमकावलं. त्यामुळे भितीने ती गर्लफ्रेंड शांत बसली. पण पुढे त्याने एका अल्पवयीन मुलीवरही अत्याचार केला. त्यावेळी त्याची गर्लफ्रेंड पुढे आली. तिने एक पुरावा दिला. पण त्यात काही नव्हते. पण पोलिसांच्या नजरेत त्यातूनही एक गोष्ट समोर पडली ती होती वॉशिंग मशीन. त्यातून या बलात्कारीचा पर्दाफाश झाला आणि तो गजाआड गेला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही घटना दक्षिण कोरियामध्ये घडली आहे. एक 24 वर्षाचा तरुण एका तरुणी बरोबर रिलेशनशिपमध्ये होता. मात्र ही रिलेशनशिप तुटणार होती. त्याला कारण ही तसेच होते. हा तरुण चांगला नाही. त्याचे अनेक अफेअर्स आहेत. शिवाय त्याच्यावर एका बलात्काराची केसही आहे. हे त्याच्या गर्लफ्रेंडला समजले होते. शिवाय एक दिवस त्याच्या फोनमध्ये तिला अनेक मुलींचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ ही मिळाले. त्यामुले तिने नातं तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबत तिने त्याला सांगितले. आता आपण तुझ्या बरोबर राहू शकत नाही. तिने हे सांगताच तो संतापला.
त्यानंतर त्याने भयंकर पाऊल उचलले. त्याने तिला अनेक तास बंदी ठेवले. त्यानंतर तिच्यावर त्याने एक नाही तर सहा वेळा अत्याचार केले. अत्याचार करताना त्याने तिचा व्हिडीओ बनवला. शिवाय काही गडबड केलीस तर तो व्हिडीओ सर्वांना पाठवेन अशी धमकी ही दिली. मात्र त्यानंतर ही त्याचे असे प्रकार सुरूच राहीले. त्यानंतर त्याने एका अल्पवयीन मुलीला ही आपली शिकार केली. याबाबतची माहिती त्या गर्लफ्रेंडलाही मिळाली. मात्र त्याच्या विरोधात कोणताही पुरावा नव्हता. मग तो कसा पकडला गेला हा प्रश्न आहे. पोलिस ही त्याच्या विरोधात पुरावे शोधत होते. पण त्यांच्या हातात ठोस असं काही मिळत नव्हतं. त्यामुळे त्यांनाही कारवाई करता येत नव्हती.
असा स्थिती त्याची शिकार झालेली गर्लफ्रेंड हिंमत करुन पुढे आली. तिने पोलिसांना एक 39 मिनीटांचा एक व्हिडीओ दिला. हा व्हिडीओ सुरक्षेसाठी लावलेल्या कॅमेऱ्यातील फुटेजचा होता. त्यामुळे या व्हिडीओत त्याने अत्याचार केल्याचे दिसून येईल असं पोलिसांना वाटलं. पण तसं काही नव्हतं. त्यात तो अत्याचार करत असताना दिसला नाही. पण तपास अधिकाऱ्याची एका गोष्टीवर नजर पडली. त्या व्हिडीओमध्ये एक वॉशिंग मशीन दिसली. त्याच्यावर चमकदार झाकण होतं. त्या झाकणात तो अत्याचार करत असल्याचं स्पष्ट पणे दिसत होतं. त्यामुळे त्याच्या विरोधात ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागला होता.
वाशिंग मशीनच्या चमकदार झाकणात रेप करतानाचं प्रतिबिंब स्पष्ट पणे दिसत होते. त्या आधारे आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्याकडे याबाबत चौकशी केली. त्याने आपण असं काही केलं नाही असं सुरवातीला सांगितलं. मात्र त्याला पुरावा दाखवल्यानंतर मात्र त्याने आपल्या गुन्हा कबूल केला आहे. या प्रकरणी त्याला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याला आठ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र शिक्षा कमी करावी अशी मागणी त्याने केली होती. त्यामुळे ती सात वर्ष करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात वॉशिंग मशीनने एका बलात्कारीला शिक्षा दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world