वसईत भर रस्त्यात तरूणीचा खून, हत्या केल्यानंतर त्याने...

भर रस्त्यात एक तरूणीची हत्या करण्यात आली आहे. लोखंडी पान्ह्याने तरूणीच्या डोक्यात वार करण्यात आले.

Advertisement
Read Time: 2 mins
वसई:

वसईमध्ये सर्वांनाच हादरवून टाकणारी घटना घडली आहे. भर रस्त्यात एक तरूणीची हत्या करण्यात आली आहे. लोखंडी पाना तरूणीच्या डोक्यात वार करण्यात आले. त्यात त्या तरूणीचा मृत्यू झाला आहे. आरती रामदुलार यादव असं तरूणीचं नाव आहे. ती 22 वर्षाची होती. तर रोहित रामनिवास यादव याने या तरूणीचा खून केला. त्याचे वय 29 वर्ष आहे. या प्रकरणी वालीव पोलिसांनी आरोपी तरूणाला अटक केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्राथमिक माहिती नुसार एकतर्फी प्रेमातून रोहित यादव याने हे कृत्य केले. सकाळी सकाळी झालेल्या या खूनाने वसईमात्र हादरून गेली आहे. रोहित याने तिचा खून केल्यानंतर तो तिच्या मृतदेहा जवळ बसला होता. लोकांनी जेव्हा हे पाहिले तेव्हा त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. तातडीने पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले. मुलीची स्थिती पाहीली तेव्हा तिच्यावर मोठ्या प्रमाणात घाव केले गेले होते. त्यातच तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी लगेचच रोहित याला ताब्यात घेतले. 

ट्रेंडिंग बातमी -  तारेवर टॉवेल वाळत घालताना भालेकर कुटुंबाचा शेवट, पती-पत्नी आणि मुलाचा मृत्यू!

वसई पूर्वेच्या वालीव पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील चिचपाडा परिसरात हृदयाचा थरकाप उडवणारी ही घटना घडली आहे. एका तरुणाने भर रस्त्यात तरुणीवर लोखंडी पान्याने वार करत तिची हत्या केली आहे. सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या हत्ये वेळी रोहित यादव यांने आरती यादव हिच्यावर लोखंडी पान्याने  वार केले. त्यानंतर ती जमिनीवर कोसळली. त्यानंतर ही तो माथेफिरू शांत झाला नाही. त्यानंतरही तो त्या तरुणीवर एका मागोमाग वार करतच होता. तिची हत्या केल्यानंत तो तिच्या मृतदेह शेजारी बसून राहिला होता. याहून गंभीर गोष्ट म्हणजे तरुणीची हत्या होत असताना रस्त्यावरील अनेकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. 

ट्रेंडिंग बातमी - IAS Officers Transfer : राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा संपूर्ण यादी

वसई विरार नालासोपारा आणि मीरा-भाईंदर या ठिकाणी वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली. मात्र तरीदेखील या परिसरातील गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नाही. या परिसरात रोज हत्या बलात्कार, यांच्यासारख्या गंभीर गुन्हे घडत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Advertisement