Maharashtra Politics: भाजपची शाखा का काढली? टोळक्याचा तरुणावर हल्ला; अकलूजमध्ये राजकीय राडा!

भाजपची शाखा का काढली? सयाजीराव मोहितेंची का काढली नाही? असा सवाल करत त्या तरुणांनी चेतन पवार यांना मारहाण केली. तसेच तलवार काढून धमकावले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

 संकेत कुलकर्णी, अकलूज: भारतीय जनता पक्षाची शाखा स्थापन का केली? असे म्हणत एक तरुणाला रस्त्यात अडवून मारहाण केल्याची तसेच तलवारीने धमकावल्याची धक्कादायक घटना अकलूज शहरात घडली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सात जणांविरोधात पोलिसामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोकसभा निवडणुकांपासून अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटील कुटुंबीय विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा संघर्ष पाहायला मिळत आहे. भाजपचे माजी आमदार राम सातपुते आणि मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. अशातच भाजपची शाखा स्थापन केल्याच्या कारणावरून चेतन अनिल पवार याला रस्त्यावर अडवून मारहाण केली आणि तलवारीने धमकावण्याचा प्रकार घडला आहे.

चेतन पवार हे आपल्या आईला बाहेरगावी जायचे असल्याने त्यांना सोडण्यासाठी शहरातील बसस्थानक परिसरात आले होते. यावेळी बाजारतळ भागामध्ये त्यांना सात जणांनी अडवले. भाजपची शाखा का काढली? सयाजीराव मोहितेंची का काढली नाही? असा सवाल करत त्या तरुणांनी चेतन पवार यांना मारहाण केली. तसेच तलवार काढून धमकावले. 

(नक्की वाचा-  Pune Swargate Bus Depot Case : शेकडो पोलिसांची फौज, श्वान पथक, ड्रोन... दत्तात्रय गाडे पोलिसांना कसा सापडला?)

 या घटनेनंतर सात जणांविरोधात अकलूज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण केलेल्यांपैकी एकाची ओळख पटली असून इतर सहा जण अनोळखी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून अकलूजमध्ये मोहिते-पाटील विरुद्ध माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि माजी आमदार राम सातपुते यांच्या गटात संघर्ष वाढला आहे.  लोकसभेच्याआधी भाजपची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्यापासून हा संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.

Advertisement

Nashik News: शेअर मार्केट गडगडलं! नाशिकमधील तरुणाने गाडीसह पेटवून घेतलं; दुर्दैवी अंत