- भाजपच्या इच्छुक महिला कार्यकर्तीने तेजस्वी घोसाळकर यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली आहे
- महिला कार्यकर्तीने पक्षाच्या खोट्या मुलाखती व फॉर्म भरण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे
- ती म्हणाली की तिने गेल्या दहा वर्षांपासून दहीसर मध्ये काम केले असून पक्षाचा आदर करते
उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पक्षाचे उमेदवार कोण आहेत हे सर्वांनाच समजले आहेत. पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षांमधील नाराजी लपून राहीलेली नाही. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं समोर येत आहेत. ही नाराजी आता जाहीर पणे इच्छक पण डावलले गेलेले उमेदवार व्यक्त करत आहेत. तसाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ दहीसर प्रभाग क्रमांक 2 मधिल आहे. इथं भाजपने शिवसेनेतून आलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी उमेदवारी दिली आहे. यामुळे इथं इच्छुक असलेल्या भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याने त्यांच्याच समोर रुद्रावतार धारण केला. शिवाय त्यांनी गोड बोलून शेलक्या भाषेत चिमटे काढले. त्यावेळी उपस्थित असलेले भाजप नेतेही आवाक झाले. पण त्यांनाही त्यावेळी काहीच बोलता आलं नाही. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या इच्छुक महिला भाजप कार्यकर्तीनी सर्व हिशोबच समोर मांडला तो ही तेजस्वी घोसाळकर यांच्या समोर. आम्ही पक्षाच्या मागे पळत असतो. पण काय केलं यांनी आपल्या सोबत. खोट्या मुलाखती, खोटे फॉर्म भरून घ्यायचे सर्वांकडून असं त्या थेट बोलल्या. त्यावेळी त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांनी त्यांनाही हटकले. नाही मी बोलणार मला थांबलायचे नाही. मी कुणाला शिव्या देत नाही. मी दादागिरी करत नाही अशा शब्दात त्यांनी सुनावलं. त्या आधी त्यांनी उमेदवारी मिळाल्याबद्दल तेजस्वी घोसाळकर यांचे अभिनंदन केले. पक्षाचा हा निर्णय मला मान्य आहे असं ही त्या म्हणाल्या.
नक्की वाचा - Kalyan Dombivli : कल्याण डोंबिवलीत मतदानापूर्वीच कमळ फुललं; भाजपाची विजयाची हॅटट्रिक!
त्यानंतर त्यांनी आपला गिअर चेंज केला. त्या म्हणाल्या घोसाळकर यांना उमेदवारी दिली परंतू कार्यकर्ता काय असतो? मी जे बोलते ते रेकॉर्ड करा सर्व. मला काही काही फरक पडत नाही. मी काम केलं आहे. मी बोलणार. मी कुणाला घाबरत नाही असं ही त्या म्हणाल्या. त्यांनी जणू रुद्रावतार धारण केला होता. कार्यकर्ता काय असतो असं सांगत त्या म्हणाल्या, मी गेली दहा वर्ष दहीसरमध्ये काम करते. आमदार मनिषा चौधरी यांनी जी जबाबदारी दिली त्याचं संधी म्हणून सोनं केलं. रात्रं दिवस काम केलं. माझ्या सोबतच्या महिलांनी काम केलं. असं असताना मी कुठे चुकली? असा खडा सवाल त्यांनी केला. उलट मी कुठे चुकली नाही. मी पक्षाचा आदर करते. तेजस्वी यांना बहुमताने निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे. पण मी कुठे चुकली त्याचं उत्तर आमदार मनिषा चौधरी यांनी द्यावं. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी हे उत्तर दिलं पाहीजे.
ज्यांना गुरू मानलं, त्यांनी तर आंधाराची दिशा दाखवली. त्यासाठी मी नाराज आहे. कार्यकर्त्याचं समर्पण असतं. तो पक्षासाठी समर्पित असतो. सगळीकडे तो काम करतो. महिला गॅस बंद करून, लोक नोकऱ्या सोडून पक्षासाठी पळतात. पण या लोकांनी आपल्या सोबत काय केलं? आपल्या खोट्या मुलाखती घेतल्या, खोटे फॉर्म भरून घेतले, यावर त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण मला थांबवू नका मी बोलणार. मला कुणी थांबवायचं नाही. मी शिवागाळ करत नाही. मी चुकीचं बोलत असेल तर मला बोलवा. आम्ही बुथमध्ये काम केलं आहे. सध्या संपूर्ण दहिसर मतदार संघात कोणी ही समाधानी नाही. इकडून तिकडून आणून तुम्ही इथं कोणालाही टाकलं आहे. असं म्हणत त्याना घोसाळकरांनाच खडे बोल सुनावत सर्व हिशोबच मांडला. हे पाहून सर्वच जण आवाक झाले.