भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) झारखंड (Jharkhand Elections) आणि महाराष्ट्रातील (Maharashtra Elections) विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक (Election 2024) जाहीर केले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सर्व 288 जागांवर एकाच टप्प्यात मतदान (Assembly Elections) होणार आहे. दुसरीकडे झारखंडमध्ये 81 जागांसाठी 13 नोव्हेंबर 2024 आणि 20 नोव्हेंबर 2024 अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांतील मतमोजणी म्हणजेच निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर 204 रोजी घोषित केले जातील.
महाराष्ट्रामध्ये (Maharashtra Vidhansabha Elections) सध्या भारतीय जनता पक्ष (BJP), शिवसेना (Shiv Sena Eknath Shinde Group) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP Ajit Pawar Group) यांच्या महायुतीचे सरकार सत्तेत आहे. तर शिवसेना (Shiv Sena UBT), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP Sharad Pawar Group) आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी राज्यात विरोधकांच्या भूमिकेत आहे. झारखंडमध्ये (Jharkhand Elections) सध्या झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) च्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडीचे सरकार आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन (AJSU), जनता दल युनायटेड (JDU) आणि लोक जनशक्ती पार्टी (LJP) यांनी युती केली आहे.