9 days ago
मुंबई:

BMC Election 2026 Mahayuti Rally Live Update: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या प्रचाराचा नारळ आज (शनिवार 3 जानेवारी) फुटला. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि शिवसेना यांची युती आहे. या दोन्ही पक्षांची संयुक्त सभा वरळीतील NSCI डोममध्ये आयोजित करण्यात आली होती.

या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह मुंबईतील भाजपा-शिवसेना आणि महायुतीचे  प्रमुख नेते उपस्थित आहेत. या प्रचारसभेतून महायुतीच्या मुंबईतील प्रचाराची रणनिती स्पष्ट झाली आहे.

मुंबईचा महापौर हा मराठीच बनेल ही काळ्या दगडावरची भगवी रेघ असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर मुंबईचा महापौर हा महायुतीचाच, हिंदूच आणि मराठीच बनेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलं.

Jan 03, 2026 21:35 (IST)

BMC Election 2026 Mahayuti Rally Live Update : आम्ही फक्त बोलणारे नाही - मुख्यमंत्री

BMC Election 2026 Mahayuti Rally Live Update : जे केलंय ते आपल्यासमोर आहे. आम्ही फक्त बोलणारे लोकं नाहीत. आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. आमच्या कामाची जिती जागती स्मारकं मुंबईत पाहायला मिळतायत. 

महानगरपालिकेच्या माध्यमातून नवी मुंबई घडवून दाखवू. आम्हाला मुंबईतील गोरगरीबांच्या जीवनात परिवर्तन करायचं आहे

Jan 03, 2026 21:30 (IST)

BMC Election 2026 Mahayuti Rally Live Update : मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाणार नाही - मुख्यमंत्री

BMC Election 2026 Mahayuti Rally Live Update : मुंबईतील मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाणार नाही. त्याला इथेच घर देऊ, मोठं घर देऊ. मुंबईकरांचं घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु. मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला घर देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. 

Jan 03, 2026 21:25 (IST)

BMC Election 2026 Mahayuti Rally Live Update :मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू आणि मराठी बनेल - मुख्यमंत्री

BMC Election 2026 Mahayuti Rally Live Update : परवा वारिस पठाण बोलले मुंबई मे बुरखेवाली मेयर बनेगी, आम्हाला वाटलं आता मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील, पण अचानक भोग्यांचे सेल डाऊन झाले. एकजण त्यावर बोलायला तयार नाही. त्यांच्या छातीवर उभारुन सांगतो या ठिकाणी महापौर हिंदूच बनेल, महापौर मराठीच बनेल, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

Jan 03, 2026 21:21 (IST)

BMC Election 2026 Mahayuti Rally Live Update : श्रेय चोरणारी टोळी सक्रीय - मुख्यमंत्री

BMC Election 2026 Mahayuti Rally Live Update : मुंबईतील निवडणुकीत श्रेय चोरणारी टोळी सक्रीय झाली आहे. या निवडणुकीत काही अबोध बालके आहेत ती श्रेय चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. ये पब्लिक है, ये सब जानती आहे.

Advertisement
Jan 03, 2026 21:19 (IST)

BMC Election 2026 Mahayuti Rally Live Update : मुंबई कुठेही सरकत नाही - मुख्यमंत्री

BMC Election 2026 Mahayuti Rally Live Update : निवडणूक आली की काही लोकांना मुंबई उत्तरेकडे सरकताना दिसते. मुंबई कुठेही सरकत नाही. मुंबई तिथंच आहे. तुमची बुद्धी सरकत असते.

Jan 03, 2026 21:17 (IST)

BMC Election 2026 Mahayuti Rally Live Update : 16 तारखेला मुंबईचा महापौर बसवायचा आहे - मुख्यमंत्री

BMC Election 2026 Mahayuti Rally Live Update : 14 तारीख ही 15 तारीख ही संक्रमणाची तारीख आहे. त्या काळात आपल्याला संक्रमणाचा चमत्कार करायचा आहे. 16 तारीख ही स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तारीख आहे. त्या दिवशी आपल्याला मुंबईमध्ये महायुतीचा महापौर बसवायचा आहे. 

Advertisement
Jan 03, 2026 21:10 (IST)

BMC Election 2026 Mahayuti Rally Live Update : शत्रू कपटी, दगेबाज, धोकेबाज आहे, पाताळयंत्री - एकनाथ शिंदे

BMC Election 2026 Mahayuti Rally Live Update : विजय आपलाच आहे. पण गाफील राहू नका. शत्रू कपटी आहे, धोकेबाज आहे, पाताळयंत्री आहे, त्यामुळे गाफिल राहू नका, असं आवाहान शिंदे यांनी या सभेत केलं.

Jan 03, 2026 20:58 (IST)

BMC Election 2026 Mahayuti Rally Live Update : मुंबई नाही यांचं राजकराण खतरेमें - शिंदे

BMC Election 2026 Mahayuti Rally Live Update : दरवेळी निवडणूक आली की महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव आहे, असं फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम सुरु होतं. मुंबई कधीही खतरेमें नव्हती, यांचं राजकारण खतरेमें आहे, असं शिंदे यांनी सांगितलं. 

कुणाचाही माई का लाल आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही. मुंबईला विकासाचे मारेकरी नको, विकासाचे वारकरी हवे आहेत. 

दिवसभर नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स हा जमाना गेला असंही शिंदे यांनी सांगितले. 

Advertisement
Jan 03, 2026 20:52 (IST)

BMC Election 2026 Mahayuti Rally Live Update : आम्ही जीव गेला तरी लाचार होणार नाही - शिंदे

BMC Election 2026 Mahayuti Rally Live Update : तुम्ही फक्त मुंबईला लुटण्याचं काम केलं. तुम्हाला तुमचं भविष्य सेफ करायचं आहे आणि आम्हाला मुंबईकरांचं भवितव्य सेफ करायचं आहे, हा फरक आहे, असं शिंदे यांनी सांगितलं.

मराठी अस्मिता विकली, मराठी बाणा विकली अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता केली. आम्ही जीव गेला तरी लाचार होणार नाही, असं शिंदे म्हणाले. 

Jan 03, 2026 20:46 (IST)

BMC Election 2026 Mahayuti Rally Live Update : मुंबईवर महायुतीचाच भगवा फडकणार - शिंदे

BMC Election 2026 Mahayuti Rally Live Update : मुंबईवर महायुतीचाच भगवा फडकणार. मुंबईचा महापौर मराठीच होणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे, असं शिंदे म्हणाले.

Jan 03, 2026 20:43 (IST)

BMC Election 2026 Mahayuti Rally Live Update : महायुतीला लाडक्या बहिणींचा पाठिंबा - शिंदे

BMC Election 2026 Mahayuti Rally Live Update : 2025 तो सिर्फ ट्रेलर था अभी तो पुरी पिक्चर बाकी आहे. महायुतीच्या विजयाचं श्रेय लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांना देतो, असं शिंदे यांनी सांगितलं.

ज्या उमेदवारांच्या पाठिशी महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला, असं शिंदे यांनी स्पष्ट केले.

 'कुणाचाही माई का लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही,'  असं शिंदे यांनी सांगितलं.

Jan 03, 2026 20:41 (IST)

BMC Election Mahayuti Rally Live Update : प्रचाराचा शुभारंभ नाही, विजयाची नादी

BMC Election 2026 Mahayuti Rally Live Update :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेत भाषण केलं. ही आपल्या प्रचाराची सुरुवात नाही तर विजयाची नांदी आहे, असं त्यांनी सांगितलं. 

Jan 03, 2026 20:27 (IST)

BMC Election Mahayuti Rally Live Update : बंद केले आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे धंदे'

BMC Election Mahayuti Rally Live Update : महायुतीच्या प्रचारसभेत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जोरदार शेरोशायरी केली. ते म्हणाले,

'मी नाही नाराज, मी जर राहिलो नाराज तर मुंबईत कसे येईल आपले राज

म्हणूनच मी मी इथे आलो आहे आज, कारण मला चढवायचा आहे मुंबईच्या महायुतीच्या महापौरावर ताज'

'एकत्र आल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, त्या दोघांनी बंद केले आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे धंदे'  अशी टोलेबाजी त्यांनी केली. 

Jan 03, 2026 20:24 (IST)

BMC Election Mahayuti Rally Live Update : रामदास आठवलेंची जोरदार शेरोशायरी

BMC Election Mahayuti Rally Live Update : महायुतीच्या प्रचारसभेत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जोरदार शेरोशायरी केली. ते म्हणाले,

'मी आज आलेलो आहे वरळीच्या डोममध्ये, पण मी नाही डोमकावळा! 

मी नाही डोमकावळा, मी तर आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा मावळा.

माझा रंग आहे सावळा पण, मी राजकारणात नाही उद्धव ठाकरेंसारखा बावळा.'

Jan 03, 2026 20:18 (IST)

BMC Election Mahayuti Rally Live Update : मुंबईचा रंग बदलू देणार नाही - साटम

BMC Election Mahayuti Rally Live Update :भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. आगामी काळात मुंबईचं ममदानीकरण होऊ देणार नाही, मुंबईचा रंग आम्ही बदलू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला

Jan 03, 2026 20:02 (IST)

BMC Election Mahayuti Rally Live Update : कोणता पक्ष किती जागा लढवणार?

BMC Election Mahayuti Rally Live Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांची युती एकत्र लढणार आहे. भाजपा 137 तर शिवसेना 90 जागांवर निवडणूक लढवणार आहे. 

Jan 03, 2026 19:30 (IST)

BMC Election Mahayuti Rally Live Update : महायुतीला बुस्टर डोस

Maharashtra Municipal Election 2026: महानगरपालिका निवडणुकीत राज्यभरातून भाजपाचे 44 तर शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. ही सर्व नावं वाचा एका क्लिकवर