Delhi Exit Poll : दिल्लीमध्ये 'AAP' ची पुन्हा सत्ता की भाजपाचं 27 वर्षांनी कमबॅक? पाहा काय आहे अंदाज

Delhi Exit Poll Results 2025 Live Update : या निवडणुकीच्या एक्झिट पोलची आकडेवारी आली आहे. त्यानुसार दिल्लीमध्ये भाजपाचं 27 वर्षांनी सरकार येण्याची शक्यता आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Delhi Exit Poll Results 2025 Live Update : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या राजधानी दिल्ली विधानसभा निवडणुकीचं मतदान पूर्ण झालं आहे. या विधानसभा निवडणुकीत दिल्लीतील सत्तारुढ आम आदमी पार्टी (AAP) आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये मुख्य लढत होती. तसंच काही मतदारसंघात काँग्रेसचंही चांगलं आव्हान होतं. या निवडणुकीच्या एक्झिट पोलची आकडेवारी आली आहे. त्यानुसार दिल्लीमध्ये भाजपाचं 27 वर्षांनी सरकार येण्याची शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात येत आहे. दिल्ली विधानसभेची स्थापना झाल्यानंतर तिथं पहिल्यांदा भाजपाची सत्ता होती. पण, 1998 साली झालेल्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. त्या पराभवानंतर दिल्ली विधानसभेवर भाजपाला कधीही त्यांचा झेंडा फडकावता आला नाही.

दिल्लीमध्ये 1998 नंतर 15 वर्ष काँग्रेसच्या शिला दीक्षित मुख्यमंत्री होत्या. तर गेली दहा वर्ष अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचं सरकार सत्तेत होतं. केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत आतिशी यांच्याकडं सत्ता सोपावली होती.

( नक्की वाचा : PM Modi Speech : राजीव, राहुल आणि केजरीवाल, पंतप्रधान मोदींचा संसदेत 'ट्रिपल अटॅक' )
 

काय आहे एक्झिट पोलचा अंदाज? (Delhi Exit Poll Results)

दिल्ली विधानसभेच्या आठ एक्झिट पोल्समध्ये भाजपाला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दिल्लीत सत्ता मिळण्यासाठी 36 जागांची गरज आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसेल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला ाहे. फक्त एकाच एक्झिट पोलमध्ये केजरीवाल सरकार पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

Advertisement

दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या सर्व एक्झिट पोल्सच्या आधारे NDTV वर पोल्स ऑफ पोल्स देण्यात आला आहे. त्यानुसार आम आदमी पक्षाला 18-25, भाजपाला 42-50 आणि काँग्रेसला 0 - 2 जागा मिळतील असा अंदाज आहे.