- पुणे महापालिकेच्या 38 क्रमांक प्रभागात 5 नगरसेवक निवडून येतात आणि या प्रभागात मोठ्या प्रमाणात खर्च होतो
- शिवसेना शिंदे गटाचे पॅनल प्रमुख नमेश बाबर यांनी निवडणुकीतील पैसे वाटप आणि प्रलोभनांविषयी माहिती दिली आहे
- पुण्यात एका प्रभागात जवळपास 100 कोटी खर्च केला जात असल्याचा आरोप होत आहे.
राहुल कुलकर्णी
महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारीला मतमोजणी होवून निकाल जाहीर केला जाईल. अनेक ठिकाणी पैसे वाटपाच्या घटना समोर आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पैसे वाटप झाल्याचा आरोप ही झाले आहेत. शिवाय वेगवेगळी प्रलोभने मतदारांनी दिल्याचे ही समोर आले होते. त्यात आता एका प्रभागात निवडणुक लढवण्यासाठी किती खर्च येतो. कोण कोणते प्रकार करावे लागत आहेत त्याचं गणित समोर आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे पॅनल प्रमुख नमेश बाबर यांनी याबाबतचा मोठा खुलासा केला आहे. त्यांनी पुण्यात कशा पद्धतीने खर्च केला जात आहे याचा हिशोबच मांडला आहे. हा हिशोब पाहीला तर तुम्ही डोक्याला हात मारल्या शिवाय राहाणार नाही.
पुणे महापालिकेतील 38 क्रमांकाचा प्रभाग हा सर्वात मोठा प्रभाग आहे. या प्रभागातून एकूण 5 नगरसेवक निवडून येतात. याच प्रभागातून शिवसेना शिंदे गटाचे पॅनल प्रमुख नमेश बाबर यांचा मुलगा निवडणूक लढवत आहेत. यांच्याच कार्यालयाची निवडणूक आयोगाने झाडाझडती घेतली. पोलीस ही येवून गेले. पैसे वाटप चाललं आहे असा त्यांना संशय होता. त्यामुळे पोलीस आले. निवडणूक आयोगाचे लोक ही आले. त्याने सर्व चेक केलं. इन कॅमेरा चेक केले. पण त्यांना काही सापडलं नाही. आम्हाला बिझी करण्याचं काम विरोधकांनी केलं असा आरोप बाबर यांनी या निमित्ताने केला. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत आहे. त्यामुळे पैसे वाटण्याचा प्रश्नच नाही असं ही ते म्हणाले.
सत्तेत असतानाही अशी कारवाई होत आहे. त्यावर सत्तेत असलो तरी सत्तेतले प्रकार तीन आहेत. अनेक पक्षाचे उमेदवार आहेत. त्यामुळे याच्या मागे कोण आहे हे सांगता येत नाही. पण जे कोणी आहेत त्यांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. अस ते म्हणाले. विरोधक चांदीच्या वाट्या वाटत आहेत. पैसे वाटत आहे. पैसे वाटताना ते सापडले आहे. मताला त्यांनी पाच हजार दिले आहेत असा गौप्यस्फोट बाबर यांनी केला. या प्रभागात जवळपास दिड लाख मतदान आहेत. मग प्रत्येकी पाच हजार देत असतील तर किती खर्च करत असतील असा प्रश्न त्यांनीच केला आहे. इथं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना असल्याचं ते म्हणाले. त्यांनी कामं केली असती तर त्यांना पैसे वाटपाची गरज नव्हती. पण कामं केली नसल्यामुळे पैसे वाटावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.
घराघरात जावून पैसे वाटले जात आहेत. जे घेत नाहीत त्यांच्या घरात पैशांची पाकीटं टाकली जात आहेत असंही ते म्हणाले. आता निवडणुकीचा ट्रेंड बदलला आहे. निवडणूक प्रक्रीयाच बदलून गेली आहे असं ही ते म्हणाले. निवडणूक आयोग काय करतयं तेच समजत नाही. पदयात्रा सुरू असते तिथे भांडणं होत आहे. प्रत्येक ठिकाणी हे होत आहे. आयोगाचा पहिला जो वचक होता तो आता ढासळताना दिसत आहे. एका प्रभागासाठी जवळपास शंभर कोटी खर्च केले जात आहेत असं ते म्हणाले. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असा विषय पुण्याचा झाला आहे. नऊ वर्षात निवडणूक झाली नाही. त्यामुळे अनेक जण आता मागे पडलो तर कायमचा मागे पडेल यामुळे खर्च करण्याकडे मागेपुढे पाहात नाहीत. जुन्या चेहऱ्यांसोबत नवे चेहरे मैदानात त्याच मुळे आहेत.
जे प्रस्थापित आहेत ते मताला पाच हजार रुपये देत आहेत. घरोघरी पैसे नेऊन टाकले जात आहेत. लकी ड्रॉ काढले जात आहेत. त्यातून जवळपास 25 टू व्हीलर वाटल्या गेल्याचे त्यांनी सांगितले. कामं केली असती तर ही वेळ आली नसती असं ही ते म्हणाले. या प्रभागात राष्ट्रवादीचे जास्त नगरसेवक आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजपची त्यांच्या विरोधातच लढत आहे. पाच हजार मताला, चांदीची भांडी, कार्यकर्त्यांना पार्टी, गाड्या तसेस परदेशी प्रवासाचे आमिष ही दाखवले जात असल्याचं बाबर यांनी सांगितलं. ते स्वत:पॅनल प्रमुख आहेत. शिवाय त्यांना निवडणुकांचा अनुभव ही आहे. त्यामुळेच त्यांनी हे खर्चाचे गणित उघड केले आहे. शिवाय निवडणुकीचा बदललेला ट्रेंड ही त्यांनी सांगितला आहे. कामा ऐवजी पैसा सध्या महत्वाचा ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं.