EXIT POLL 2026: दक्षिणेची कुणाला साथ? तामिळनाडूत कोणाची जादू? केरळममध्ये काँग्रेस की डावे?

सर्व पोलचा विचार केल्यास तामिळनाडूमध्ये डीएमके काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल अशी स्थिती आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • तामिळनाडूमध्ये वेगवेगळ्या एक्झिट पोल्सनुसार स्टॅलिन यांच्या डीएमके-काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत
  • केरळमध्ये काँग्रेस प्रणीत UDF ला ७५ ते ९० जागांचा अंदाज असून ती सत्तेत येण्याची शक्यता
  • पुदुच्चेरीमध्ये एनडीएला १६ ते २० जागा मिळण्याचा अंदाज असून त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापनेची संधी
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

दक्षिणेतल्या तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आता समोर आले आहे. वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या या एक्झिट पोलनुसार वेगवेगळे अंदाज समोर आले आहेत. काही एक्झिट पोलनुसार तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांची सत्ता कायम राहील असं सांगितलं आहे. तर केरळमध्ये काँग्रेस सत्तेत येणार असं दिसत आहे. तर पुदुच्चेरीमध्ये एनडीएला सत्ता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे दक्षिणेत समिश्र निकाल येण्याचा अंदाज एक्झिट पोलीमध्ये वर्तवण्यात आला आहे. 
 
पीपल्स पल्सने केलेल्या एक्झिट पोलनुसार केरळमध्ये काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे. त्यांनी काँग्रेस प्रणीत UDF ला 75-85 जागांचा अंदाज दाखवला आहे. तर डाव्या पक्षांच्या LDF ला 75-65 जागांचा अंदाज आहे. भाजपला शुन्य ते तीन जागांचा अंदाज दाखवला आहे. तर AXIS MY INDIA ने ही केरळमध्ये काँग्रेसचीच सत्ता येणार हे स्पष्ट केले आहे. या पोल नुसार काँग्रेस प्रणित 
UDF ला 78-90 जागा, तर डाव्या पक्षांच्या LDF ला 49-62 जागा मिळतील. तर  NDA-0-3 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे काँग्रेस केरळमध्ये सत्तेत येईल असा अंदाज आहे. 

नक्की वाचा - Shivsena UBT: विधान परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर, 'या' नावामुळे पेच निर्माण होणार?

तामिळनाडूमध्ये PEOPLE PULSE च्या एक्झिट पोलनुसार स्टॅलिन यांची डीएमके सत्तेत परतण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. DMK आणि काँग्रेस आघाडीला 125-145 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर ADMK+-65-80 जागा मिळतील. त्याच बरोबर अभिनेता विजय याच्या TVK ला 18-24 जागांचा अंदाज व्यक्त केला आहे. या शिवाय इतरांना 2 ते 6 जागा मिळतील. मॅट्रीज, पीमार्क, पिपल्स इन्साईट या संस्थांनी केलेल्या पोल नुसार ही डीएमके पुन्हा सत्तेत येईल अशी स्थिती आहे. सर्व पोलचा विचार केल्यास तामिळनाडूमध्ये डीएमके काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल अशी स्थिती आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Cabinet decision:'साता समुद्रापार महापुरूषांच्या विचारांचा जागर' राज्य मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय

पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात ही निवडणूका झाल्या होत्याय या ठिकाणी पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार  एनडीए- 16-19, एसपीए- 10-12 इतर- 1-2 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर एक्सेस माय इंडिया नुसार NRC+ ला 16-20 जागा मिळतील. तर काँग्रेसला 6-8 तर TVK ला दोन ते चार जागांचा अंदाज आहे. त्यामुळे इथं भाजप प्रणित एनडीएला सत्ता स्थापनेची संधी असल्याचं दिसून येत आहे.