भाजपने गुजरात जिंकले पण चर्चा मात्र काँग्रेसच्या 'त्या' एकाच उमेदवाराची

मोदींच्या गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपला चांगली साथ मिळाली. इथल्या 26 पैकी 25 जागा जिंकल्या. पण ऐवढा मोठा विजय जरी भाजपला मिळाला असला तरी त्यांच्या या आनंदावर एका पराभवाने विरजण पडले आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
गांधीनगर:

लोकसभा निवडणुकीत देशातीलकाही राज्यात भाजपला जबरदस्त फटका बसत असताना, मोदींच्या गृहराज्य असलेल्या  गुजरातमध्ये भाजपला चांगली साथ मिळाली. इथल्या 26 पैकी 25 जागा जिंकल्या. पण ऐवढा मोठा विजय जरी भाजपला मिळाला असला तरी त्यांच्या या आनंदावर एका पराभवाने विरजण पडले आहे. 2014 आणि 2019 साली गुजरातमध्ये भाजपने काँग्रेसला क्लिन स्विप दिली होती. तीच री या निवडणुकीतही ओढत सर्वच्या सर्व जागा 2024 लाही जिंकण्याचा निर्धार करत हॅट्रीकटी तयारी गुजरात भाजपची होती. पण तसे झाले नाही. गुजरातच्या बनासकांठा लोकसभा मतदार संघात काँग्रेसचा झेंडा फडकला. त्यामुळे भाजपच्या विजया पेक्षा बनासकांठा लोकसभेतील भाजपच्या पराभवाचीच जास्त चर्चा होताना दिसत आहे. इथून काँग्रेसच्या गेनिबेन ठाकोर यांनी मोठा विजय मिळवत भाजपचे क्लिन स्विप देण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. 

कोण आहेत गेनिबेन ठाकोर?     

गेनिबेन ठाकरे यांना काँग्रेसने गुजरातच्या बनासकांठा या लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती. पाकिस्तान सीमे लगत हा लोकसभा मतदार संघ आहे. भाजपने इथून रेखाबेन चौधरी यांना उमेदवारी दिली होती. हा मतदार संघ भाजपचा गड होता. गेनिबेन या वाव विधानसभेतून दोन वेळा निवडून आलेल्या आहेत. त्या विद्यमान आमदारही आहेत. नुकतीच त्यांनी गुजरात विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्या विजयी झाल्या होत्या. त्यामुळे लगेच लोकसभा कशी लढायची असा प्रश्न त्यांना होता. पण जनतेच्या पाठिंब्यावर त्या मैदानात उतरल्या आणि यशस्वी ठरल्या. त्यांनी भाजपच्या गणिताच्या प्रोफेसर असलेल्या रेखाबेन चौधरी यांचा 30 हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव करत भाजपच्या या गडाला खिंडार पाडले. त्यामुळे हा विजय भाजपच्या जिव्हारी लागला आहे. शिवाय सलग तिसऱ्यांदा सर्व जागा जिंकण्याचे स्वप्नही भंग पावले आहे. मागिल निवडणुकीत इथून भाजप उमेदवाराने तीन लाखा पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला होता. 

Advertisement

मतदारांनीच दिले निवडणुकीसाठी पैसे 

गेनिबेन या सर्व सामान्य कुटुंबातील आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याकडे मुबलक पैसे नव्हते. अशा वेळी त्यांना लोकांनीच पैसे गोळा करून दिले होते. त्या जिथे प्रचाराला जात होत्या तिथे त्यांना दहा रूपयांपासून शंभर रूपयांपर्यंत निवडणुकीसाठी पैसे दिले जात होते. यातून त्यांनी दिड दोन लाख रूपये जमा केले होते असेही त्यांनी सांगितले. त्यांच्यासाठी प्रियंका गांधी यांनी जाहीर सभा घेतली होती. 2012 साली त्यांनी पहिल्यांदा वाव विधानसभेतून निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. मात्र 2017 साली झालेल्या निवडणुकीत त्यांनी बाजी मारली. शिवाय 2022 च्या निवडणूकीतही त्या विधानसभेत पोहोचल्या. 

Advertisement

गेनिबेनच्या विजयाने काँग्रेसला दिलासा 

गुजरात मध्ये लोकसभा निवडणूकीत तब्बल एक दशकानंतर काँग्रेसला विजय मिळवता आला आहे. दहा वर्षाचा सुकाळ काँग्रेसने या निवडणुकीत संपवला आहे. देशभरात काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. त्याचा उत्साह पक्षात आहे. कार्यकर्ते जल्लोष करत आहे. असा वेळी गुजरातची एक जागाही काँग्रेससाठी महत्वाची आहे. या एका जागेने गुजरात काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या विजयानंतर गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष शक्ती सिंह गोहिल यांनीही आनंद व्यक्त करत अभिनंदन केले होते. 
   

Advertisement