Humayun Kabir: बाबरी मस्जिदसाठी ममतांसोबत पंगा घेणारे हुमायूं कबीर जिंकले की हरले? नाओदात टक्कर

त्यांची लढत टीएमसीच्या साहीना खान यांच्या सोबत होत आहे. या मतदार संघातून हुमायूं कबीर विजयी होतील असं बोललं जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

West Bengal Election Result 2026 Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यात ही सर्वांचे लक्ष मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रेजीनगर आणि नाओदा या दोन जागांकडे लागले आहे. तृणमूल काँग्रेसमधून (TMC) बाहेर पडल्यानंतर आपली स्वतंत्र 'आम जनता उन्नयन पार्टी' (AUJP) स्थापन करणारे हुमायूं कबीर या दोन्ही जागांवरून निवडणूक लढवत आहेत. बाबरी मशीद उभारणीबाबत त्यांनी वक्तव्य केले होते. त्यानंतर ते देशभरात चर्चेत आले होते. शिवाय त्यांनी तृणमुल काँग्रेसमधून हाकलपट्टी ही करण्यात आली होती. त्यांच्या दोन्ही मतदार संघाची मतमोजणी सुरू आहे. त्यात ते नाओदा मतदार संघातून आघाडीवर आहेत.  

नक्की वाचा - Election Result LIVE: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना मोठा धक्का, कलानुसार भाजपला स्पष्ट बहुमत

कबीर यंदा किंगमेकर ठरणार की त्यांना पराभवाचा धक्का बसणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पश्चिम बंगालमध्ये आज 293 जागांचे निकाल जाहीर होत आहेत. मुर्शिदाबादमध्ये हुमायूं कबीर यांचा प्रयोग यशस्वी होणार का, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष आहे. बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरून तृणमूलने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर कबीर यांनी स्वतःची 'आम जनता उन्नयन पार्टी' स्थापन केली होती. त्यांनी स्वतः दोन जागांवरून नशीब आजमावले असून त्यांच्या पक्षाने एकूण 22 उमेदवार उभे केले आहेत. 

Advertisement

नक्की वाचा - Assembly election Result LIVE 2026: तामिळनाडूत डीएमके तर केरळमध्ये काँग्रेस आघाडीवर

"आम्ही किमान 5 ते 8 जागा जिंकू," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. तृणमूलच्या साहिना मोमताज खान आणि भाजपच्या राणा मंडर यांच्याकडून त्यांना नाओदामध्ये मोठे आव्हान मिळत आहे. दोन टप्प्यांत झालेल्या 93 टक्क्यांहून अधिक मतदानाचा फायदा नक्की कोणाला होणार, हे काही तासांतच स्पष्ट होईल. सुरूवातीच्या कलानुसार नोवादा मतदार संघातून आघाडीवर आहेत. त्यांनी जवळपास अडीच हजार मतांनी आघाडी घेतली होती. त्यांची लढत टीएमसीच्या साहीना खान यांच्या सोबत होत आहे. या मतदार संघातून हुमायूं कबीर विजयी होतील असं बोललं जात आहे.