Kalyan Dombivli : कल्याण डोंबिवलीत मतदानापूर्वीच कमळ फुललं; भाजपाची विजयाची हॅटट्रिक!

Kalyan Dombivli Municipal Election 2026: ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महापालिकेत 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वीच भाजपानं विजयाची हॅटट्रिक पूर्ण केलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan Dombivli Municipal Election 2026:  कल्याण डोंबिवलीत भाजपानं निवडणुकीपूर्वीच गुलाल उधळला आहे.
कल्याण:

Kalyan Dombivli Municipal Election 2026:  ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महापालिकेत 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वीच भाजपानं विजयाची हॅटट्रिक पूर्ण केलीय. पॅनल क्रमांक 26 ब मधून रंजना मितेश पेणकर या भाजपा उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. 

रंजना पेणकर यांच्या विरोधातील अपक्ष उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये बाद झालाय. त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या आघाडीनं उमेदवार दिला नव्हता. विरोधामध्ये उमेदवारच नसल्यानं पेणकर या विजयी झाल्या आहेत. 

भाजपाच्या तिसऱ्या उमेदवार विजयी

कल्याण डोंबिवलीत बिनविरोध निवड झालेल्या पेणकर या एकमेव भाजपा उमेदवार नाहीत. यापूर्वी आसावरी केदार नवरे आणि रेखा चौधरी या देखील भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी झाल्या आहेत. 

आसावरी केदार नवरे यांनी पॅनल क्रमांक 26 (क) या खुल्या प्रवर्गातून विजयी झाल्या. तर रेखा चौधरी या पॅनल क्रमांका 18 (अ) मधून विजयी झाल्या. नवरे यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली. तर रेखा राजन चौधरी देखील बिनविरोध विजयी झाल्या आहेत. 

Advertisement

( नक्की वाचा : Thane Municipal Election ठाण्यात शिवसेना-भाजप युती, मनसेच्या 28 उमेदवारांची घोषणा; पाहा तुमच्या प्रभागात कोण? )
 

कशी आहे निवडणूक?

कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण 122 जागा आहेत. यंदाच्या निवडणुकीत सत्तारुढ भाजपा- शिवसेना यांची युती आहे. शिवसेना 66 तर भाजपा 56 जागांवर निवडणूक लढवत आहे. अजित पवार यांचा पक्ष महायुतीमधून बाहेर पडला असून ते 42 जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. 

भाजपा शिवसेना युतीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या आघाडीचं आव्हान आहे.यांच्या जागावाटपात शिवसेना (उबाठा) 68 जागांवर तर मनसे 54 जागा मिळाल्या आहेत. 

Advertisement

( नक्की वाचा : Thane News शिंदेंच्या ठाण्यात भाजपाचा 'मास्टरस्ट्रोक'; 40 उमेदवारांच्या यादीत 5 मुस्लीम चेहरे, वाचा सर्व नावं )

सत्तारुढ आणि विरोध पक्षांच्या आघाडीला बंडखोरीचं ग्रहण लागलंय. या बंडखोरांचं मन वळवण्याचं काम सध्या सुरु आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर सर्व प्रभागातील नेमकं चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर प्रचाराला खऱ्या अर्थाने वेग येईल.