KDMC Election : कल्याण-डोंबिवलीतील 'त्या' 20 जागांचा निकाल आता कोर्टात ठरणार? महायुतीचं टेन्शन वाढलं!

Kalyan Dombivli Municipal Election 2026 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचे 20 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.  

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan Dombivli Municipal Election 2026 : नविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
कल्याण:

Kalyan Dombivli Municipal Election 2026 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचे 20 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.  त्यानंतर राजकीय वातावरण तापले असतानाच आता या प्रक्रियेला कायदेशीर आव्हान मिळण्याची शक्यता आहे. ईव्हीएम मशीनवर नोटा हा पर्याय उपलब्ध असताना उमेदवारांना बिनविरोध कसे घोषित केले जाऊ शकते, असा सवाल उपस्थित करत सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी उपस्थित केलाय . त्यांनी या प्रकरणात न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

काय आहे आक्षेप?

कल्याण डोंबिवलीत महायुतीचे 20 उमेदवार बिनविरोध झाल्याने एकीकडे जल्लोष साजरा केला जात असला तरी, श्रीनिवास घाणेकर यांनी यावर कायदेशीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, ईव्हीएमवर नोटा (NOTA) हा एक महत्त्वाचा पर्याय मतदारांकडे उपलब्ध असतो. नोटाला जर उमेदवारापेक्षा जास्त मते मिळाली तर तो उमेदवार पराभूत मानला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत मतदारांना मतदानापासून वंचित ठेवून उमेदवारांना थेट बिनविरोध घोषित करणे कितपत योग्य आहे, असा आक्षेप त्यांनी व्यक्त केला आहे.  

मतदानापासून कोणालाही वंचित ठेवता येत नाही, त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर निकषांवर तपासायला हवी, असं मत घाणेकर यांनी 
सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा संदर्भ देत त्यांनी स्पष्ट केले.

( नक्की वाचा : महापालिकेत महायुतीला बुस्टर डोस; भाजपाचे 44 तर शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध विजयी, वाचा सर्व नावं एका क्लिकवर )

महायुतीचा जल्लोष 

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतील प्रत्यक्ष मतदानापूर्वीच महायुतीनं मोठी आघाडी घेतलीय.  एकूण 20 जागांपैकी 14 जागांवर भाजप तर 6 जागांवर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यातील 17 जागांवर इतर पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले, तर 3 जागांवर भाजपच्या उमेदवारांविरोधात कोणीही अर्ज भरला नव्हता. 

Advertisement

 निवडणूक अधिकाऱ्यांनी अद्याप याची अधिकृत घोषणा केली नसली, तरी संबंधित प्रभागांमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. मात्र, घाणेकर यांच्या भूमिकेमुळे आता या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

( नक्की वाचा : Kalyan Dombivli: कल्याण-डोंबिवलीत 'महायुती'चा धमाका! उमेदवारांच्या यादीत कुणाचं नाव? वाचा संपूर्ण यादी )

श्रीनिवास घाणेकर यांनी या प्रकरणात स्वतः आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या विधानानंतर कल्याण डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 

निवडणूक अधिकारी या प्रकरणावर काय भूमिका घेतात आणि न्यायालय नोटाच्या अधिकाराबाबत काय निकाल देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर न्यायालयाने या प्रक्रियेत हस्तक्षेप केला, तर बिनविरोध निवडणुकीच्या निर्णयावर मोठा परिणाम होऊ शकतो.
 

Advertisement