लोकसभा निवडणुकीला 19 एप्रिलपासून देशभरात सुरुवात होणार आहे. 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होतंय. तर महाराष्ट्रातील 48 जागांसाठी 5 टप्प्यात मतदान होणार आहे.
मतदान ओळखपत्राशिवाय कसं मतदान करता येईल याबाबतचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत.
तुमची अठरा वर्ष पूर्ण झाली असतील तर तुम्ही मतदान करण्यासाठी पात्र आहात. अनेकजण मतदान ओळखपत्र नसल्यानं मतदान करत नाहीत. त्यांच्यासाठीच निवडणूक आयोगानं ही खास सवलत दिली आहे. मतदाराकडं निवडणूक ओळखपत्र नसेल तर अन्य कागदपत्रं सादर करुन मतदान करता येईल.
या कागदपत्रांसह करा मतदान
आधार कार्ड
पॅन कार्ड
मनरेगा जॉब कार्ड
भारतीय पासपोर्ट
ड्रायव्हिंग लायसन्स
रेशन कार्ड
बँक पासबूक
विमा स्मार्ट कार्ड
पेन्शन दस्ताऐवज
सामाजिक न्यायमंत्रालयानं दिलेले दिव्यांग कार्ड
मतदाराचा चेहरा आणि ओळखपत्रावरील फोटो यामध्ये साधर्म्य नसेल तरी तुम्हाला मतदान करता येईल. त्या परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगानं प्रमाणित केलेल्या कोणत्याही कागदपत्रावरील फोटो दाखवून तुम्हाला मतदान करता येईल. कोणताही मतदार मतदान करण्यापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय. पण, त्यासाठी त्याचं नाव मतदार यादीत असणं आवश्यक आहे.