Video : 'त्यांना शिक्षा करा', मतदान न करणाऱ्यांना काय म्हणाले परेश रावल?

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते परेश रावल यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

देशभरातील 6 राज्य आणि 2 केंद्र शासित प्रदेशातल्या 49 लोकसभा मतदारसंघात सोमवारी (20 मे) मतदान झालं. मुंबईमध्ये अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी मतदान केलं. शाहरुख खान, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, अक्षय कुमार, तब्बू यांच्यासह अनेकांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. अभिनेते परेश रावल यांनीही मतदान केलं. त्यावेळी त्यांनी मतदारांना लोकशाहीतील कर्तव्य बजावण्याचं आवाहान केलं. त्याचवेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले परेश रावल?

परेश रावल यांनी मतदान न करणाऱ्यां शिक्षा देण्यात यावी असं मत व्यक्त केलं. 'सरकार हे करत नाही ते करत नाही, असं तुम्ही म्हणता... पण आज मतदान केलं नाही तर त्याला तुम्हीच जबाबदार आहात. ज्यांनी मतदान केलं नाही त्याला तेच जबाबदार आहेत. सरकार जबाबदार नाही. जे नागरिक मतदान करत नाहीत त्यांच्यासाठी काही तरी शिक्षेची तरतूद हवी. तुम्ही हवं तर त्यांचा कर वाढवा..काही तरी शिक्षा व्हायला हवी,' असं परेश रावल यांनी व्यक्त केलं.  

Advertisement
Advertisement

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या परेश रावल यांनी यावेळी सांगितलं की, ' सर्वांनी मतदान केलं पाहिजे. उन्हाळा असो थंडी त्यानं फरक पडत नाही. आपल्या देशासाठी भारताच्या विकासासाठी मतदान करा. कृपया मतदान नक्की करा. खराब राजकारणी जन्माला येत नाहीत. ते मतदान न करता सहलीला जाणाऱ्यांकडून तयार केले जातात.'

Advertisement

(नक्की वाचा : कल्याण लोकसभा मतदारसंघातील 50 हजार नावं गायब? डोंबिवलीकर मागणार न्यायालयात दाद )

परेश रावल यांचं वक्तव्य चांगलंच व्हायरल झालंय. सोशल मीडियावर याच्या जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. काही युझर्सनी परेश रावल यांना पाठिंबा दिलाय तर काहींनी नाराजी व्यक्त केलीय. 'सर्वजण नंतर सरकारला शिव्या देतात. पण मतदानाच्या दिवशी गायब होतात,' असं मत एका युझरनं व्यक्त केलं. 'परेश रावल एकदम बरोबर बोलत आहेत. सर्वांनी मतदान करुन त्यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायला हवा,' असं एका युझरनं सांगितलं. तर  'परेश रावल यांना त्यांच्या पक्षाला विजयी करायचं आहे. त्यासाठी ते सर्वांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. सर, तुमच्या ज्ञानाची कुणाला गरज नाही,' असं मत अन्य एका युझरनं व्यक्त केलं आहे. 

Topics mentioned in this article