ग्लोबल वॉर्मिंगमुळे देशाला उष्णतेच्या लाटेचा धोका; लोकसभा निवडणुकीवरही होणार परिणाम

वाढत्या पाऱ्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवरही पाहायला मिळू शकतो.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

मे महिन्यात उत्तर भारतातील अनेक भागात उष्णतेचा प्रभाव पाहायला मिळत आहे. अद्याप देशाच्या अनेक भागातील पाच टप्प्यातील मतदान शिल्लक आहे आणि वाढत्या पाऱ्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवरही पाहायला मिळू शकतो. यादरम्यान भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम मोहापात्रा यांनी NDTV सोबतच्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत इशारा दिला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढत आहे आणि या महिन्यात देशातील 15 राज्यात उष्णतेच्या लाटेचे दिवस अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 7 मे ते 1 जून 2024 या कालावधीत ज्या  राज्यांचे पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे, त्यांचाही समावेश आहे. 

महासंचालक डॉ. एम मोहापात्रा म्हणाले, मे महिन्यात तापमान कसं असेल, याचा अंदाज लावला जात आहे. समुद्रात, जमिनीवर आणि वातावरणातील निरीक्षणे घेतली जात आहेत आणि ती गोळा केल्यानंतर, उच्च कार्यक्षमता मोजणीद्वारे, पुढील महिन्यात तापमान कसे असेल हे कळते. पश्चिमेकडील भागात, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशातील पश्चिमेकडील भाग आदी ठिकाणी मे महिन्यात 8 ते 11 दिवसांपर्यंत उष्णतेच्या लाटेचा धोका आहे. याशिवाय मध्य प्रदेशातील इतर भाग झारखंड, बिहार, दिल्ली, पंजाबमध्ये सर्वसाधारणपणे तीन ते चार दिवस उष्णतेची लाट पाहायला मिळते, तेथे मे महिन्यात 5 ते 7 दिवसांपर्यंत उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. 

नक्की वाचा - 2 जूनला मेगाहाल होणार? 600 लोकल रद्द, कारण काय?

निवडणुकीतील उष्णतेच्या लाटेच्या अंदाजाबाबत डॉ. मोहापात्रा म्हणाले, निवडणुकीच्या तयारीसाठी आम्ही हवामानाची माहिती दिली होती आणि कोणत्या  कालावधीत कुठे उष्णतेची लाट असू शकते याचाही अंदाज वर्तवला होता. आम्ही आगामी पाच दिवसांपर्यंत हवामान विभागाची माहिती निवडणूक आयोगाला देत आहोत आणि यासाठी आयोगाकडून योग्य ती पाऊलं उचलली जात आहे.   

निवडणुकीच्या कामकाजात सक्रिय असणाऱ्यांना उष्णतेच्या लाटेचा अधिक परिणाम होऊ शकतो. भारताच्या उत्तर पूर्वेकडील भागातही वाऱ्याचा वगासह हिट स्ट्रोकची भीती वाढली आहे. हिटवेव्हपासून बचाव करण्यासाठी कमीत कमी घराबाहेर पडा आणि महत्त्वाचं असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आलं आहे. 

Advertisement