अवघ्या काही तासांंमध्ये गेम फिरला, लोकसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध होणार?

Lok Sabha Speaker Election : लोकसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:


Lok Sabha Speaker Election :  लोकसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी (26 जून) निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सत्तारुढ NDA कडून मागील लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर विरोधकांच्या 'इंडिया आघाडी' चे काँग्रेस खासदार के. सुरेश रिंगणात आहेत. सुरेश यांनी अध्यक्षपदासाठी शेवटच्या क्षणी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे निवडणूक होणार असं स्पष्ट झालं होतं. पण,  या निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

इंडिया आघाडीचे उमेदवार के. सुरेश त्यांचा अर्ज मागे घेणार असून ओम बिर्ला यांची निवड बिनविरोध होईल, अशी माहिती 'NDTV मराठी' ला सूत्रांनी दिली आहे. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी सकाळी 11 वाजता होणार आहे. त्यापूर्वी सुरेश अर्ज मागे घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. इंडिया आघाडीतील वेगवेगळ्या पक्षांचे सुमारे 7 खासदार मतदानाला उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे आधीच कमी असलेलं विरोधकांचं संख्याबळ आणखी कमी होणार आहे. त्यामुळे सुरेश माघार घेणार असल्याचं समजतंय.

18 व्या लोकसभेत NDA कडं स्पष्ट बहुमत आहेत.  वायएसआर काँग्रेसनंही बिर्ला यांना पाठिंबा जाहीर केलाय. आंध्र प्रदेशातील या पक्षाचे लोकसभेत चार खासदार आहेत. सत्तारुढ आघाडीचं वाढलेलं बळ आणि विरोधकांचे अनेक खासदार दिल्लीत नसल्यानं सुरेश ऐनवेळी अर्ज मागे घेतील, असं मानलं जातंय. 

( नक्की वाचा : 3 वेळा फोन...खर्गेंचा अपमान केल्याचा राहुल गांधींचा आरोप! राजनाथ यांनी दिलं उत्तर )
 

तृणमूल काँग्रेस नाराज

दरम्यान लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्ज भरण्यास दहा मिनिटं बाकी असतानाच के. सुरेश यांनी अर्ज भरला. काँग्रेसच्या या निर्णयावर इंडिया आघाडीतील विसंवाद समोर आले. तृणमूल काँग्रेसनं या निर्णयाची आपल्याला कोणतीही कल्पना नव्हती, असं सांगितलंय. आम्हाला हा निर्णय टीव्हीवरच समजला असं तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय यांनी सांगितलं. तर आमच्याशी याबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती. काँग्रेसनं या निर्णयाचं कारण आम्हाला समजावून सांगावं, असं पक्षाचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी सांगितलं. 

Advertisement

( नक्की वाचा : आणीबाणी जाहीर झाली त्यावेळी सोनिया गांधी पंतप्रधानांच्या घरात होत्या! भाजपा नेत्याचा दावा )
 

राहुल गांधी यांनी या निवडणुकीत एनडीएला पाठिंबा देण्याच्या बदल्यात लोकसभा उपाध्यक्षपदाची मागणी केली होती. त्यावर सरकाकडून सकारात्मक आश्वासन न मिळाल्यानं के. सुरेश यांनी शेवटच्या क्षणी अर्ज दाखल केला.