Maharashtra Election Result 2026 Live Updtaes : मराठवाड्यात छत्रपती संभाजीनर, नांदेड- वाघाळा, लातूर, परभणी आणि जालना या पाच महानगरपालिकांमध्ये मतदान झालं. त्यानंतर आज (शुक्रवार, 16 जानेवारी) सर्व ठिकाणी मतमोजणी सुरु झाली आहे.
यंदाच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या निकालांकडं मराठवाड्यातील पाच महापालिकांच्या नागरिकांसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.
मराठवाड्यातील प्रत्येक महानगरपालिकेतील ताजी स्थिती आणि निकाल तुम्हाला इथं वाचायला मिळतील. त्यासाठी हे पेज नियमित रिफ्रेश करा.
लातूर महानगरपालिका निवडणूक - काँग्रेसला स्पष्ट बहुमत ( Latur Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates )
लातूर महानगरपालिकेत काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळालं आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीनं 70 पैकी 47 जागा जिंकत बहुमत मिळवलं आहे. तर भाजपाला 20 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. विशेष म्हणजे एकट्या काँग्रेसनंच 43 जागा जिंकत महापालिकेत एकहाती सत्ता मिळवली आहे.
एकूण जागा - 70 ( अंतिम निकल)
काँग्रेस - 43
वंचित - 4
भाजपा - 22
राष्ट्रवादी (अप) - 1
( नक्की वाचा : BMC Election 2026 Result : मुंबईतील उद्धव ठाकरेंच्या पराभवाचे राज ठरले व्हिलन! 25 वर्षांचा गड अखेर कोसळला )
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक - आतापर्यंत कोण आघाडीवर ( Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election Result 2026 Live Updates )
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपा आणि शिवसेना हे महायुतीचे पक्ष एकमेकांच्या विरुद्ध लढले होते. या दोन्ही पक्षात सध्या चुरस पाहायला मिळत आहे.
एकूण जागा - 115
भाजपा - 35
शिवसेना - 15
एआयएमआयएम - 16
शिवसेना (उबाठा) - 8
काँग्रेस - 2
वंचित - 4
एनसीपी (एसपी) - 1
एनसीपी (एपी) - 1
इतर - 1
नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणूक - आतापर्यंत कोण आघाडीवर ( Nanded-Waghala Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates )
एकूण जागा - 81
भाजपा - 26
शिवसेना - 10
एआयएमआयएम - 14
जालना महानगरपालिका निवडणूक - आतापर्यंत कोण आघाडीवर ( Jalna Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates )
जालना महानगरपालिकेत सुरुवातीच्या टप्प्यात भाजपानं मोठी आघाडी घेतली आहे. जालना महानगरपालिका निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे आणि भावजय सुशिला दानवे विजयी झाले आहेत.
एकूण जागा - 65
भाजपा - 33
शिवसेना - 6
काँग्रेस - 7
एआयएमआयएम - 2
अपक्ष - 1
परभणी महानगरपालिका निवडणूक - आतापर्यंत कोण आघाडीवर ( Parbhani Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates )
एकूण जागा - 65
शिवसेना (उबाठा) - 23
भाजपा - 13
काँग्रेस - 11
एनसीपी (एपी) - 12
एआयएमआयएम - 1