Maharashtra Exit Polls 2024 : NDA ची वाटचाल महाराष्ट्रात अडखळणार? दोन्ही आघाड्यांमध्ये काँटे की टक्कर

Maharashtra Exit Polls 2024 : एक्झिट पोलच्या भाकितानुसार महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये राज्यात काँटे की टक्कर आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

Maharashtra Exit Polls 2024 :  लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Elections 2024) मतदान पूर्ण झालंय. सातही टप्प्यांचं मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. या पोलनुसार देशात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीएचं सरकार सत्तेवर येणार असा अंदाज आहे. सर्व पोल्समध्ये एनडीएला 300 पेक्षा जास्त जागा देण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या पारंपारिक राज्यांसह ओडिशा, बंगाल, तामिळनाडूमध्येही भाजपा चांगली कामगिरी करणार असं भाकित या पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय. त्याचवेळी महाराष्ट्रात मात्र एनडीएची वाटचाल अडखळणार असा अंदाज या पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय. एक्झिट पोलच्या भाकितानुसार महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये राज्यात 'काँटे की टक्कर' आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कुणी किती जागा लढवल्या?

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील भाजपानं 28, शिवसेना 15, राष्ट्रवादी काँग्रेस 4 आणि रासपनं 1 जागी निवडणूक लढवली. तर महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं 21, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 10 जागा लढवल्या.  

गेल्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांची युती होती. या युतीनं 48 पैकी 41 जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसनं 4, काँग्रेस अपक्ष 1 आणि AIMIM पक्षानं प्रत्येकी 1 जागा जिंकली होती.

( NDTV Poll of Polls : देशात पुन्हा 'मोदी सरकार'?, एक्झिट पोलच्या आकड्यांनी इंडिया आघाडीचं टेन्शन वाढलं )
 

महायुतीला फटका

महायुतीनं या लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 45 जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवलं होतं. एकाही एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महायुतीला 45 जागा देण्यात आलेल्या नाहीत. एबीपी सी व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 24 तर मविआला 23 जागा मिळतील असं भाकित करण्यात आलंय. टीव्ही 9 पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 22 तर मविला 26 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

Advertisement

रिपब्लिक PMARQ च्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 29 तर मविआला 19 जागा देण्यात आल्यात. रिपब्लिक भारत-मॅट्रीझच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 30 ते 35 तर मविआला 13 ते 19 जागा मिळतील.  न्यूज 24 चाणक्यनं महायुतीला 33 तर मविआला 15 जागा दिल्या आहेत. इंडिया न्यूज डी डायनॉमिक्सनं महायुतीला 34 तर महाविकास आघाडीला 13 जागा देण्यात आल्या आहेत. 

( नक्की वाचा : Exit Polls : गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलचा काय होता अंदाज ? किती ठरले खरे? )
 

राज्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं होतं. त्यानंतर जातीय संघर्ष अधिक टोकदार झाला आणि त्यामधून मतविभागणी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. एक्झिट पोलच्या भाकितामध्येही हेच स्पष्ट होतंय. या संघर्षाचा फटका महायुतीला बसेल असं चित्र एक्झिट पोलमधून समोर आलंय. 
 

Advertisement