Maharashtra Zilla Parishad Elections 2026 Live :राज्यातील प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीसाठी आज मतदान होत आहेत. यापूर्वी या निवडणुकांचे मतदान 5 फेब्रुवारी रोजी होणार होते. पण, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर हे मतदान 2 दिवस पुढे ढकलण्यात आले.
ज्या जिल्ह्यांमध्ये मतदान होतंय त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यांतही मतदान होत आहे. तसेच कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांचा या यादीत समावेश आहे. या सर्व ठिकाणी जिल्हा परिषदेसोबतच 125 पंचायत समित्यांसाठीही मतदान होईल.
या मतदानाचे सर्व LIVE अपडेट तुम्हाला इथं वाचायला मिळतील. त्यासाठी हे पेज नियमित रिफ्रेश करा.
Chhatrapati Sambhajinagar Election LIVE Updates: नवरदेवाने लग्नाआधी बजावला मतदानाचा हक्क
छत्रपती संभाजी नगर शहरालगत असलेल्या पिसादेवी येथील मतदान केंद्रावर लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क
कृष्णा तायडे असं या नवरदेवाच नाव असून आज पार पडणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला
माझे लग्न असताना देखील मी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलो आहे लोकशाहीने आपल्याला दिलेला हा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावाला हवा माझे लग्न असून मी आलो तसंच प्रत्येकाने बाहेर पडून मतदान करायला पाहिजे असे आवाहन हळदीने माखलेल्या नवरदेवाने केले
Latur Election LIVE Update: माझ्या मुलाची उमेदवारी जनतेच्या आग्रहाखातर दिली आहे: बाबासाहेब पाटील
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद च्या, जिल्हा परिषद शाळेवरील मतदान केंद्रावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. पंचायत समितीच्या शिरूर गणातून सहकार मंत्र्यांचे सुपुत्र सुरज पाटील रिंगणात आहेत प्रचारादरम्यान सहकार मंत्र्यांना विरोधकांनी मुलाच्या उमेदवारीवरून चांगलंच घेरलं होतं. यावर स्पष्टीकरण देत असताना माझ्या मुलाची उमेदवारी ही जनतेच्या आग्रहाखातर दिलेली उमेदवारी आहे तर स्पष्टीकरण बाबासाहेब पाटील यांनी दिलेलं आहे
Maval Election LIVE Update: मावळात सकाळपासून 8.63 टक्के मतदान
मावळमध्ये जिल्हा परिषदेने निवडणुकीसाठी सकाळी 07:30 ते 09:30 पर्यंत 8.63 टक्के मतदान झाले आहे.
Pandharpur Election LIVE Update: पहिल्या दोन तासात पंढरपूर मध्ये 5.61 टक्के मतदान
पंढरपूर 8 जिल्हा परिषदजिल्हा परिषद गट व पंचायत समिती मतदान टक्केवारी....
पहिल्या दोन तासात पंढरपूर मध्ये 5.61 टक्के मतदान.....
पहिल्या दोन तासात मंगळवेढ्यात 5.14 टक्के मतदान.....
ZP Election LIVE Updates: खासदार कल्याण काळे यांनी बजावला मतदानाचा हक्क
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान प्रक्रिया आज राज्यभरात पार पडत आहे. या छत्रपती संभाजी नगरातील 63 जिल्हा परिषद आणि 126 पंचायत समितीसाठी मतदान प्रक्रिया होत आहे. यावेळी जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी मला मतदानाचा हक्क बजावला आहे. छत्रपती संभाजीनगर लगत असलेल्या पिसादेवी येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान करून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर रावसाहेब दानवे यांनी कॉरिडोर या शब्दाचा अर्थ कल्याण व काळे यांना माहीत नसल्याची टीका केली होती यावर प्रत्युत्तर देत कल्याण काळे यांनी ड्रायफ्रूट आणि ड्रायपोर्ट यांच्यातील अर्थ त्यांना माहित नाही असा टोला लगावला आहे.
Dharashiv Election LIVE Updates: राणाजगजितसिंह पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क
भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मूळ तेर गावी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावं आवाहन
राणा जगजीत सिंह पाटील यांच्यासोबत पत्नी अर्चना पाटील, मुलगा मल्हार पाटील एकत्र मतदानासाठी
आपल्या भागामध्ये बदल घडण्याचे अनुषंगाने खूप काम करण्याच्या अनुषंगाने ताकतीने मतदान करावे आवाहन
Dharashiv ZP Election LIVE Updates: धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क
शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क
परंडा तालुक्यातील मुगाव येथे बजावला मतदानाचा हक्क
जिल्ह्यात शिवसेनेला मतदारांच्या जोरावर शिवसेनेला चांगलं यश मिळेल विश्वास
अध्यक्षपदाबाबत पक्षप्रमुख एकनाथ शिंदे जे सांगतील तो निर्णय घेणार आमदार तानाजी सावंत
धाराशिव जिल्ह्यात भाजप व शिवसेना पक्षाने अद्यक्ष पदा वर केला आहे.
तानाजी सावंत यांनी पुन्हा दावा सांगत पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे जो आदेश देतील तो मान्य करणार
Latur Election LIVE Update: धीरज देशमुख, इशिता देशमुख, वैशाली देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क
लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी बाभळगाव येथे माजी आमदार धीरज देशमुख, दिपशिखा देशमुख आणि वैशालीताई देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन मतदारांना केले. परिसरातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळत आहे.
Parbhani Election LIVE Update: मतदान करण्यासाठी रोखल्याने परभणी मध्ये मतदान केंद्रावर वाद
परभणीच्या राणीसावरगाव मध्ये मतदान करण्यापासून रोखल्यामुळे मतदान केंद्रावर वाद झाला आहे महंतांनी थेट मतदान केंद्र अधिकार्यावर भाजपाची दलाली करत असून आपल्याला मतदानापासून रोखले असल्याचा आरोप केलेला आहे यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर देखील हा वाट चालूच होता दरम्यान महंत मतदान न करताच मतदान केंद्रावरून बाहेर पडले आहेत दरम्यान हा वाद सकाळी सकाळी झाला असल्याने चर्चेला उधाण आले आहे.
Ratnagiri ZP Election LIVE Update: चिपळून तालुक्यात 1o-12 ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद
चिपळूण तालुक्यात अनेक ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याच्या घटना
चिपळूणमध्ये 10 ते 12 ठिकाणी मशीन पडलं बंद
चिपळूण तालुक्यातील सावर्डे पिंपळ मोहल्ला, सावर्डे कॉलनी, कुडप, अलोरे, इथे evm मशीन पडलंय बंद
पर्यायी मशीन आल्यानंतरच इथलं मतदान सुरू होणार
मशीन बंद पडल्याने मतदारांची अवस्था गोंधळल्यासारखी
Sangli ZP Election LIVE Update: आमदार जयंत पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.ईश्वरपूर नजीक असणाऱ्या साखराळे या त्यांच्या गावा मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे.रांगेत उभे राहुन आमदार जयंत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आणि पंचायत समिती निवडणुकीत चांगलं यश मिळेल,असं मत यावेळी जयंत पाटलांनी व्यक्त केले.
Ratnagiri Election LIVE Updates: नवरीने लग्नाआधी बजावला मतदानाचा हक्क
नवरीने बजावला मतदानाचा हक्क
लग्नाच्या मुहूर्ताच्या आधी साधला मतदानाचा मुहूर्त
खेड जामगे इथल्या मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क
रेश्मा नरळकर असं नवरीचं नाव
Karad Election LIVE Update: कराड तालुक्यातील चचेगाव येथे ईव्हीएम मशीन सुरू होईना
कराड तालुक्यातील चचेगाव येथे ईव्हीएम मशीन सुरू होईना
सुरुवातीलाच ईव्हीएममुळे मतदानाला उशीर
बुथ क्रमांक 78 वरील मशीन बंद
काँग्रेस आणि भाजप उमेदवार या ठिकाणी मोठी चुरस
मतदान केंद्रावर झोनल अधिकारी दाखल
Baramati ZP Election LIVE Update: आमदार रोहित पवार पिंपळी येथील मतदान केंद्रावर दाखल
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार बारामती तालुक्यातील पिंपळी येथील मतदान केंद्रावर दाखल..
आपल्या संपूर्ण कुटुंबासह. .
बजावणार मतदानाचा हक्क...
Solapur ZP Election LIVE Updates: सोलापुरात उमेदवाराकडून मतदान केंद्राची पूजा
- सोलापुरातील कोंडी जिल्हा परिषद गटात उमेदवाराकडून मतदान केंद्राची पूजा करण्यात आली
- शिवसेना ठाकरे गटाच्या कोंडी पंचायत समिती गणाचे उमेदवार सोमनाथ राऊत यांच्याकडून पूजा करण्यात आली
- सोलापूर मध्ये झेडपीचे 68 आणि पंचायत समितीचे 136 गणासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे
Raigad Election LIVE Update: अलिबागमध्ये मतदान केंद्रावर EVM मशीन बिघडली
अलिबाग मध्ये सहान येथील मतदान केंद्रावर evm मध्ये बिघाड.
अलिबाग तालुक्यातील सहान येथील मतदान केंद्रवर मतदान सुरु होण्यापुर्वीच बिघाड.
मतदार रांगा लावून उभे आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी टेक्निकल टीम पाचरण केली असून लवकरच येथील मतदान सुरु करण्यात येईल.
Baramati ZP Election LIVE Update: बारामती तालुक्यातील पिंपळी येथे मतदान केंद्रावर पिंक मतदान केंद्र
बारामती
* बारामती तालुक्यातील पिंपळी येथे मतदान केंद्रावर पिंक मतदान केंद्र
* बारामतीतील पहिलं पिंक मतदान केंद्र
* सर्व कामकाज महिला पार पाडणार
* महिलांना सक्षम करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न
Dharashiv Election LIVE Updates: धाराशिवमध्ये राडा, पैसे वाटपावरुन मोठा गोंधळ
धाराशिव भूम तालुक्यात मतदारांना पैसे वाटपावरून भाजपाने राष्ट्रवादीच्या उमेदवारामध्ये गोंधळ
भूम तालुक्यातील पाथरूड जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी च्या उमेदवाराकडून मतदाराला पैसे वाटप करत असल्याचा भाजप उमेदवाराकडून आरोप
पाथरूड जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचे उमेदवार सिताराम वनवे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल भोरे दोघांमध्ये पैसे वाटपावरून राडा
पैसे वाटप करणाराला पोलिसांनी घेतले ताब्यात, रात्री दीड वाजता सुरू होत पैसे वाटप
Solapur ZP Election LIVE Update: माळशिरस, यशवंतनगर मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद
माळशिरसच्या यशवंतनगर मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन पडले बंद..
सुमारे 40 मिनिटांपासून ईव्हीएम मशीन बंद
मतदार रांगेत ताटकळत उभारले...
Maharashtra ZP Election LIVE: राज्यभरात मतदानाला सुरुवात, ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी
राज्यभरात झेडपी, पंचायत समितीच्या मतदानाला सुरुवात: पाहा राज्यभरातील सर्व घडामोडी लाईव्ह....
Chhatrapati Sambhajinagar Election LIVE Updates: मतदानाला सुरुवात, EVM मशीन बिघडल्याच्या तक्रारी
छत्रपती संभाजी नगरच्या पिसादेवी येथील बुथ क्रमांक 15 मधील खोली क्रमांक पाच मध्ये असलेले ईव्हीएम मशीन बंद
ईव्हीएम मशीन खराब झाल्याने मतदानाला सुरुवात नाही
सुरुवातीपासूनच ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड
मतदान सुरुवात न झाल्यामुळे बुध क्रमांक पंधरा वरील खोली क्रमांक पाच बाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा
अधिकारी कर्मचाऱ्यांकडून ईव्हीएम मशीन बदलण्यासाठी तयारी सुरू
Walunj Election LIVE Updates: वाळुंजमध्ये बदलली EVM मशीन
मतदान केल्यानंतर मशीन मधून आवाजच येत नाही असा आरोप करण्यात येत आहे. या आरोपानंतर ही मशीन बदलण्यात आली आहे.
Latur ZP Election LIVE Updates: लातूरमध्ये मतदानाला सुरुवात
लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि १० पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील १ हजार ७४७ मतदान केंद्रांवर प्रक्रिया सुरू असून ८ हजार ४१४ अधिकारी-कर्मचारी तैनात आहेत. जिल्हा परिषदेसाठी २४२ तर पंचायत समित्यांसाठी ४१९ उमेदवार रिंगणात आहेत. शांततामय मतदानासाठी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त असून मतदारांनी अधिकृत ओळखपत्रासह मतदान करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Sindhudurg Election LIVE Update: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मतदान सुरू
सिंधुदुर्गात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडले असून मतदार केंद्रावर काही प्रमाणात रांगा लागलेल्या पाहायला मीळत आहेत मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला असून १०० मीटरच्या बाहेर वाहनांना प्रवेश देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या ५० व पंचायत समितीच्या १०० जागांसाठी ही निवडणूक होत असली तरी 8 जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत तर पंचायत समितीचे 17 सदस्य निवडून आले आहेत
Sindhudurg Election LIVE Update: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मतदान सुरू
सिंधुदुर्गात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडले असून मतदार केंद्रावर काही प्रमाणात रांगा लागलेल्या पाहायला मीळत आहेत मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला असून १०० मीटरच्या बाहेर वाहनांना प्रवेश देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या ५० व पंचायत समितीच्या १०० जागांसाठी ही निवडणूक होत असली तरी 8 जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत तर पंचायत समितीचे 17 सदस्य निवडून आले आहेत
Solapur ZP Election LIVE Updates: सोलापूर जिल्हा परिषदेसाठी मतदानाला सुरुवात
सोलापूर जिल्हा परिषदेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 2758 मतदान केंद्रावर 24 लाख 59 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 2017 साली झालेल्या जिल्हा परिषदेच्या मतदानास66.96 टक्के इतके मतदान झाले होते. त्या तुलनेत आज किती मतदान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Baramati ZP Election LIVE Updates: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, शर्मिला पवार यांनी काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला.
Kolhapur Election LIVE Updates: कोल्हापुरात महाडिक विरुद्ध सतेज पाटील सामना
कोल्हापुरातील 68 जिल्हा परिषद आणि 136 पंचायत समितीसाठी निवडणूक पार पाडत आहे. या निवडणुकीतील मतदान प्रक्रिया उद्या होत आहे. सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होईल. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष वेगळे लढत आहेत. कोल्हापूर दक्षिण, कागल, चंदगड, करवीर, हातकणंगले, राधानगरी मतदारसंघात चूरशीच्या लढती आहेत. महाडिक विरुद्ध पाटील, मंडलिक विरुद्ध मुश्रीफ, आमदार विनय कोरे विरुद्ध सत्यजित पाटील, राहुल पाटील विरुद्ध आमदार चंद्रदीप नरके, शिवाजी पाटील असा सत्तासंघर्ष या निवडणुकीत आहे.
Baramati ZP Election LIVE Updates: DCM सुनेत्रा पवार काटेवाडीत करणार मतदान
१) जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ,पार्थ पवार,
दिवंगत अजित पवार यांच्या मातोश्री
आशा पवार काटेवाडी जिल्हा परिषद बजावणार मतदानाचा हक्क...
२) आमदार रोहित पवार, पत्नी कुंती, आई सुनंदा वडील राजेंद्र पवार यांच्यासह पिंपळी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बजवणार मतदानाचा हक्क.
३) युगेंद्र पवार वडील श्रीनिवास पवार आई शर्मिला पवार यांच्यासह कन्हेरी जिल्हा परिषद शाळेत बजावणार मतदानाचा हक्क ...
४) शरद पवार यांचे मतदान माळेगाव नगरपरिषदेत व सुप्रिया सुळे यांचे मतदान बारामती नगरपालिकेत असल्याने त्यांचे मतदान या निवडणुकीत येत नाही (माहितीसाठी)
Dharashiv Election LIVE Updates: धाराशिव जिल्हा परिषद, आणि आठ पंचायत समितीसाठी आज मतदान प्रक्रिया
धाराशिव जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या 55 तर पंचायत समितीच्या 110 जागांसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल. यासाठी जिल्ह्यातील एकूण 11 लाख 45 हजार 888 मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार असून यासाठी प्रशासनाकडून 1308 मतदान केंद्र देखील उभारण्यात आली आहेत.
मतदान प्रक्रिया पूर्ण व्हावी यासाठी निवडणूक विभाग व सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणादेखील सज्ज असणार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार तानाजी सावंत, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री बसवराज पाटील, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांसह जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठापनाला लागल्या आहेत.
Maharashtra Election LIVE Updates: बारामतीची पोट निवडणुकीच्या हालचाली सुरु
पूणे जिल्ह्यामधील २०१-बारामती विधानसभा मतदारसंघाची रिक्त झालेली जागा भरण्यासाठी लवकरच विधानसभेची पोट निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या वतीने सदर विधानसभा मतदारसंघाकरता दिनांक ०१ जानेवारी, २०२६ या अर्हता दिनांकावार आधारित मतदारयाद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची घोषणा. कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रकही जाहीर.
ZP Election LIVE Updates: भाजप उमेदवारांकडून पैशाचे वाटप, अंबादास दानवेंचा आरोप
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज जिल्हा परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र मतदानाच्या काही तासापूर्वी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत गंभीर आरोप केले आहे. संभाजीनगरमधील पैठण आणि बिडकीन गावात भाजप मतदानासाठी पैसे वाटप करत आहे. तर भाजप उमेदवार विजय चव्हाण 3 हजार रुपये प्रति मतदार वाटप करत असल्याचा आरोपही दानवेंनी केला आहे. पैसे वाटप सुरू असताना निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.
Chhatrapati Sambhajinagar Election LIVE Updates: संभाजीनगरमध्ये आज मतदान, ९० हजार अधिकारी आणि कर्मचारी तैनात
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या ६३ जागा आणि ९ पंचायत समित्यांच्या १२६ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. जिल्हयातील एकूण १८ लाख ७३ हजार ५३ मतदार आज १८९ लोकप्रतिनिधींचे भवितव्य ठरवणार आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात सव्वापाच हजार पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे.
त्यासोबतच ९० हजार अधिकारी आणि कर्मचारी या कामावर लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यातील २२८२ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया राबवली जात आहे. विशेष म्हणजे ३४ केंद्रे ही 'अतिसंवेदनशील' म्हणून घोषित करण्यात आली असून, त्यामध्ये सिल्लोड तालुक्यातील सर्वाधिक १४ केंद्रांचा समावेश आहे. सकाळी साडेसात वाजता प्रत्यक्षात मतदानाला सुरवात होणार आहे.