पैसे-दारुच्या बाटल्या दाखवल्या, जोरदार राडा, ठाकरे-मनसेचे कार्यकर्ते भिडले

छत्रपती संभाजी नगरातील क्रांती चौकात ठाकरे गटाचे सैनिक आणि मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी जोरदार राडा झाला.

Advertisement
Read Time: 2 mins
छ. संभाजीनगर:

छत्रपती संभाजी नगरातील क्रांती चौकात ठाकरे गटाचे सैनिक आणि मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी जोरदार राडा झाला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मनसे कार्यकर्त्यांनी पाहून त्यांना नोटा दाखवल्या. शिवाय घ्या सुपारी म्हणत मनसैनिकांची खिल्ली उडवली. यानंतर मनसैनिकांनीही नोटा आणि दारूच्या बाटल्या दाखवल्या. त्यानंतर एकच राडा झाला. हातात असलेल्या झेंड्यांच्या दांड्याने एकमेकांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे गोंधळ उडाला. क्रांती चौकातली वाहतूकही ठप्प झाली. त्यात दोन्ही बाजूने जोरादार घोषणाबाजी सुरूच होती. 

छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी प्रचारचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे युती आणि आघाडीच्या उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदारां पर्यंत पोहचण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे संभाजीनगरमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली होती. ही रॅली क्रींती चौकात आली. त्याच वेळी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आले. त्यात मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते. मनसेचे कार्यकर्ते समोर दिसल्यानंतर अंबादास दानवे यांनी त्यांना पैशांच्या नोटा दाखवल्या. त्यामुळे वातावरण तापलं. यावेळी हे लोक पैसे देऊन आणल्याचा आरोप दानवे यांनी  सांगत होते. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते भडकले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. शिवाय त्यांनीह पैशाच्या नोटा दाखवल्या. दारुच्या बाटल्या दाखवल्या गेल्या. हा सर्व प्रकार क्रांती चौकात सुरू होता. काही वेळात परिस्थिती हाता बाहेर गेली. काहींनी हातात असलेल्या झेंड्याच्या दांड्यांनी मारहाण करायला सुरूवात केली. मात्र वेळीच काही जणांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.  

Advertisement

छत्रपती संभाजीनगरमध्ये हायहोल्टेज सामना होत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे हे मैदानात आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भूमरे लढत आहेत. एमआयएमचे इम्तियाज जलीलही निवडणूक लढत आहेत. त्यामुळे इथे तिरंगी लढत होत आहे. दरम्यान प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रचाराचा धुरळा या तिघांकडून उडवला जाणार आहे.  

Advertisement

Advertisement