Nagpur News नागपुरात भाजपाचं धक्कातंत्र; 4 सर्वेक्षणांतून ठरले उमेदवार, 'या' आजी-माजी नगरसेवकांचं कापलं तिकीट

Nagpur Municipal Election 2026 : नागपूर महानगरपालिकेवर पुन्हा एकदा आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Nagpur Municipal Election 2026 : नागपूर महापालिका निवडणुकीत भाजपानं अनेक दिग्गजांना घरचा रस्ता दाखवला.
नागपूर:

Nagpur Municipal Election 2026 : नागपूर महानगरपालिकेवर पुन्हा एकदा आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली आहे. महापालिका निवडणुकीच्या या रणधुमाळीत भाजपने अत्यंत सावधपणे पावले टाकत आपली रणनीती आखली आहे. यावेळेस भाजपने शिवसेनेसोबत युती केली असली, तरी जागावाटपात मात्र आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. एकूण 151 जागांपैकी शिवसेनेला केवळ 8 जागा सोडण्यात आल्या असून उर्वरित जागांवर भाजपने आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत.

नव्या रणनीतीवर भर आणि सर्वेक्षण

नागपूर महापालिका राखण्यासाठी भाजपने गेल्या अनेक महिन्यांपासून पद्धतशीर तयारी सुरू केली होती. उमेदवारांची निवड करताना पक्षाने केवळ नावांचा विचार न करता खास पद्धतीचा अवलंब केला. तिकीट वाटप करण्यापूर्वी भाजपच्या वतीने नागपूरमध्ये संभाव्य उमेदवारांसाठी तब्बल 4 वेगवेगळी सर्वेक्षणे घेण्यात आली होती. या सर्वेक्षणांमधून समोर आलेला अहवाल, संबंधित कार्यकर्त्याची भागातील सक्रियता आणि त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती या त्रिसूत्रीच्या आधारावर पक्षाने यंदाचे तिकीट वाटप केले आहे.

( नक्की वाचा : Nagpur News : बंडखोरी नडली, घर फुटलं! भाजपच्या माजी महापौरांनी सोडलं नवऱ्याचं घर; नागपुरात मोठी खळबळ )

माजी नगरसेवकांना धक्का

यावेळेस उमेदवारी देताना भाजपने अत्यंत कठोर निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वेक्षणाचे निकाल आणि कामगिरीच्या आधारावर पक्षाने अनेक माजी नगरसेवकांचे तिकीट कापले आहे. प्रस्थापित नेत्यांना डावलून नव्या आणि सक्रिय चेहऱ्यांना संधी देण्यावर भर देण्यात आला आहे. भाजपचा हा नवीन प्रयोग जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण करणार की पक्षाला पुन्हा सत्तेच्या खुर्चीवर बसवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

नागपूरमध्ये 'या' आजी-माजी नगरसेवकांचं भाजपानं कापलं तिकीट

 
सरला नायक
शकुंतला पारवे 
नसीमबानो खान 
प्रवीण भिसीकर 
अर्चना पाठक 
अमर बागडे 
वर्षा ठाकरे 
उज्ज्वला शर्मा 
संजय बंगाले 
शिल्पा धोटे 
योगीता तेलंग 
प्रमोद कौरती 
लता काडगाए 
सुमेधा देशपांडे 
नेहा वाघमारे
यशश्री नंदनवार 
दीपराज पाडींकर 
महेश महाजन 
ज्योती भिसीकर 
राजेश घोडपागे
वंदना यंगटवार 
श्रद्धा पाठक
मनोज चापले
मनीषा धावडे 
अनिल जैंद्रे 
चेतना टांक
वैशाली रोहणकर 
मनीषा कोठे
समिता चकोले 
वंदना भुरे
हरीष दिकोंडवार 
रेखा साकोरे
भगवान मेंढे 
स्वाती आखतकर
नागेश सहारे
रिता मुळे
उषा पॅलेट 
शीतल कामे 
अभय गोटेकर 
वंदना भगत
राजेंद्र सोनकुसरे 
माधुरी ठाकरे
जयश्री वाडीभस्मे
अविनाश ठाकरे 
पल्लवी शामकुळे
लहुकुमार बेहते 
प्रकाश भोयर
प्रमोद तभाने
सोनाली कडू 
नंदा जिचकार