नारायण राणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार असतील याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राणेंनी मतदार संघात सभा, गाठीभेटी आणि मेळाव्यांचा धडाका लावला आहे. कार्यकर्त्यां बरोबर ते संवाधही साधत आहेत. अशाच एका मेळाव्यात त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये कसा गेलो याचा किस्साच सांगितला आहे. देवेंद्र फडणवीस आपल्या मागे कसे लागले होते, भेट कुठे झाली, चर्चा काय होती, याचा उलगडाच राणे यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी रस्त्यावरच....
भाजपमध्ये यावे यासाठी देवेंद्र फडणवीस आपल्या मागे लागले होते. त्यांचा भाजपमध्ये येण्यासाठी आग्रह होता. एकदा रस्त्यावर फडणवीस मला भेटले. तिथेच त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. त्यावेळी मी एका पक्षाचा नेता आहे. असे रस्त्यावर विचारणे योग्य नाही. भेटू चर्चा करू नंतर निर्णय घेवू असे मी त्यांना सांगितल्याचे राणे यांनी सांगितले. सर्व गोष्टींचा विचार केला. त्यानंतरच भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो विचार करूनच घेतो असेही ते म्हणाले. एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर पद दिले जाते. ते देण्यासाठी स्वत: तेवढी पत बनवतो असेही ते म्हणाले.
हेही वाचा - 'एकीकडे लढण्याचे नाटक, दुसरीकडे बिनशर्त पाठींबा' राज यांना उद्धव यांनी डिवचले
नारायण राणेंचा भाजप प्रवेश अन् मंत्रीपद
नारायण राणे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत सुरूवातीला स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांनी हा पक्ष विलीन करत भाजपमध्ये प्रेवश केला होता. त्यानंतर त्याना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली होती. केंद्रात गेल्यानंतर मोदी सरकारमध्ये त्यांना लघु सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. राणेंना या निवडणुकीत भाजपकडून रत्नागिरी लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - मोदींना बिनशर्त पाठींबा का दिला? राज यांनी कारण सांगितलं