- पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने आपल्या सर्व नेत्यांना मैदानात उतरवले आहे
- दिलीप कांबळे यांनी प्रचारात काँग्रेस उमेदवार प्रशांत जगताप यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे
- प्रशांत जगताप हे पूर्वी राष्ट्रवादी गटात होते आणि नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला
रेवती हिंगवे
पुणे महापालिका निवडणुकीचा प्रचार आता जोशात सुरू आहे. भाजपने पुण्यातील आपले सर्व नेते मैदानात उतरवले आहेत. त्यात आजी माजी मंत्र्यांचाही समावेश आहे. काही करून पुणे माहापालिका आपल्या हातात ठेवायची यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी जोर लावला आहेत. भाजपतर्फे माजी राज्यमंत्री दिलीप काबळे हे ही प्रचाराच्या मैदानात आहेत. मात्र प्रचारा दरम्यान त्यांनी जीभ घसरली. त्यांनी काँग्रेस नेते आणि उमेदवार प्रशांत जगताप यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केलीय. त्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायर होत आहेत. त्यांचे वक्तव्य पाहाता सभ्य पुण्याला काय झालं असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
वानवडी-साळुंके विहार प्रभागामध्ये काँग्रेसचे प्रशांत जगताप हे निवडणूक लढत आहेत. जगताप हे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम करून काँग्रेसमध्ये आले. अनेक वर्षांचे शरद पवारांसोबतचे संबंध त्यांनी तोडले. काँग्रेसचा हात त्यांनी पकडला. त्यांच्याच प्रभागात भाजपचे माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी प्रशांत जगताप यांना लक्ष्य केलं. त्यांच्यावर टीका करण्याच्या नादात आपण काय बोलतोय याचे भान ही त्यांना राहीले नाही.
जगताप हे पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये आले. तो धाग पकडत कांबळे यांनी जगताप यांच्यावर टीका करण्याच्या नादात शिवराळ भाषा वापरली. शरद पवार साहेबांचे फोटो याने संपूर्ण ऑफीसमध्य लावले होते. पवारांच्या पावसातल्या सभेचे हे फोटो होते. पण पक्ष बदलल्यानंतर एका दिवसात ते काढून टाकले. काय निष्ठा आहे. अरे बापरे. असं म्हणत अंत्यंत घाणेरडी आणि कुणाला ही सहन न होणारी शिवी कांबळे यांनी जाहीर सभेत घातली. त्या पेक्षा वाईट गोष्ट म्हणजे तिथं उपस्थित असलेल्यांनी यावेळी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या.
प्रशांत जगताप यांनीही कांबळे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. भाजपला पराभव समोर दिसत असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता सैरभैर झालेल्या भाजपचे माजी मंत्री दिलिप कांबळे यांनी काल मला अतिशय घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. वानवडी - साळुंखे विहार प्रभागातील नागरिकांनो आपल्याला भाजपची ही घाणेरडी संस्कृती मान्य आहे का ? आपल्याला ही अश्लील प्रवृत्ती आपल्या प्रभागात नकोय. म्हणूनच या शिवीला आपण मतदानाच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर देऊया, "पंजा" या चिन्हासमोरील बटण दाबून भाजपच्या घाणेरड्या प्रवृत्तीचा निषेध करूया! अशी प्रतिक्रीया दिली आहे.