महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलं, सांगली-भिवंडीचा तिढाही सुटला

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

महाविकास आघाडीचं अखेर लोकसभेचं जागावाटप निश्चित झालं आहे. जागा वाटपात कोणाच्या वाट्याला किती जागा आल्या आहेत हे महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलं. या पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे नाना पटोले उपस्थित होते. शिवसेना २१, काँग्रेस १७ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट १० जागांवर निवडणूक लढणार आहे. याची अधिकृत घोषणा शिवसेनेच्या शिवालय या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.  


मविआत ठाकरे गटच मोठा भाऊ   
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सर्वाधिक जागा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदरात पडल्या आहेत. 48 लोकसभेच्या जागांपैकी शिवसेना 21 जागांवर लढणार आहे. विशेष म्हणजे ज्या सांगलीच्या जागेवरून वाद होता ती जागाही ठाकरेंनी आपल्या पदरात पाडून घेतली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आलेल्या जागा पुढील प्रमाणे.

1) बुलढाणा - प्रा. नरेंद्र खेडेकर

2) यवतमाळ - वाशिम - संजय देशमुख

3) मावळ - संजोग वाघेरे - पाटील

4) सांगली - चंद्रहार पाटील

5) हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर

6) संभाजीनगर - चंद्रकांत खैरे

7) धारशीव - ओमराजे निंबाळकर

8) शिर्डी - भाऊसाहेब वाघचौरे

9) नाशिक - राजाभाऊ वाजे

10) रायगड - अनंत गीते

11) सिंधुदुर्ग - रत्नागिरी - विनायक राऊत

12) ठाणे - राजन विचारे

13) मुंबई - ईशान्य - संजय दिना पाटील

14) मुंबई - दक्षिण - अरविंद सावंत

15) मुंबई - उत्तर पश्चिम - अमोल कीर्तिकर

16) परभणी - संजय जाधव

17) दक्षिण मध्य - अनिल देसाई

18) कल्याण - वैशाली दरेकर

19) हातकणंगले - सत्यजित पाटील

20) पालघर - भारती कामडी

21) जळगाव - करण पवार 

काँग्रेस 17 जागांवर लढणार 
शिवसेनेनंतर काँग्रेसच्या वाट्याला १७ जागा आल्या आहेत. मात्र ज्या भिवंडी आणि सांगली जागेसाठी काँग्रेस आग्रही होती त्या जागा मात्र काँग्रेसच्या वाट्याला आल्या नाहीत. मुंबईत काँग्रेस दोन जागांवर लढेल. भिवंडीची जागा काँग्रेसच्या हातून गेल्यानं कोकणात काँग्रेस एकाही जागेवर लढणार नाही. काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागा खालील प्रमाणे.

1) रामटेक -           शामकुमार  बर्वे

2) नागपूर -            विकास ठाकरे

3) भंडारा- गोंदिया   प्रशांत पडोले

4) गडचिरोली -       नामदेव किरसन

5) लातूर -              शिवाजीराव काळगे

6) सोलापूर -          प्रणिती शिंदे

7) कोल्हापूर -        शाहू महाराज छत्रपती 

8) पुणे -                रवींद्र धंगेकर

9)  नांदेड -             वसंतराव चव्हाण

10) अमरावती - बळवंत वानखेडे

11) नंदुरबार - गोवाल पाडवी

12) अकोला - डॉ. अभय पाटील

13) चंद्रपूर - प्रतिभा धानोरकर

14)  धुळे - 

15)  जालना

16)  उत्तर मध्य मुंबई

17) उत्तर मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 10 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे ज्या भिवंडी जागेसाठी पवारांनी आग्रह धरला होता ती जागाही राष्ट्रवादीला मिळाली आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला कोणत्या कोणत्या जागा आल्या आहे ते एकदा पाहूयात. 

Advertisement

1) वर्धा - अमर काळे

2) दिंडोरी - भास्कर भगरे

3) बारामती - सुप्रिया सुळे

4) शिरूर - डॉ. अमोल कोल्हे

5)  अहमदनगर - निलेश लंके

6)  बीड - बजरंग सोनावणे

7)  भिवंडी - सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे

8)  सातारा

9) माढा

10) रावेर

सांगली शिवसेनेला तर भिवंडी राष्ट्रवादीला 
ज्या जागांवरून शेवटपर्यंत ताणलं गेलं होतं अखेर त्याजागांवर एकमत झालं आहे. काँग्रेसनं सांगली आणि भिवंडी या दोन्ही जागांवर दावा केला होता. मात्र सांगलीची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली आहे. तिथून शिवसेनेचे चंद्रहार पाटील निवडणूक लढतील. त्यांच्या उमेदवारीची घोषणा आधीच करण्यात आली आहे. तर भिवंडीची जागा शरद पवारांच्या पारड्यात गेली आहे. तिथे बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.