हिशेब चुकता! 5 वर्षानंतर डोक्यावरची टोपी काढणार, सत्तार-दानवे वाद पेटणार?

मंत्री रावसाहेब दानवे यांचा दणदणीत पराभव झाला. या पराभवामुळे सलग पाच वेळा निवडून येण्याच्या त्यांच्या घोडदौडीला लगाम बसला. त्यांच्या पराभवा मागे कोणाचा हात होता तेही आता समोर आले आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
जालना:

जालना लोकसभा मतदार संघात भाजप नेते आणि मंत्री रावसाहेब दानवे यांचा दणदणीत पराभव झाला. या पराभवामुळे सलग पाच वेळा निवडून येण्याच्या त्यांच्या घोडदौडीला लगाम बसला. त्यांच्या पराभवा मागे कोणाचा हात होता तेही आता समोर आले आहे. महायुतीत असलेले मंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी जाहीर पणे माझाच्या कार्यकर्त्यांनी दानवेंचा पराभव केला असे सांगून टाकले आहे. शिवाय दानवेंच्या या पराभवाने सत्तारांनी घेतलेली शपथ ही आता त्यांना पुर्ण होणार आहे.  

हेही वाचा - भाजपने गुजरात जिंकले पण चर्चा मात्र काँग्रेसच्या 'त्या' एकाच उमेदवाराची

सत्तारांची शपथ काय होती? 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत युतीधर्म म्हणून अब्दुल सत्तार यांनी जालना लोकसभा मतदार संघात रावसाहेब दानवे यांचा प्रचार केला. शिवाय त्यांच्या सिल्लोड विधानसभा मतदार संघातूनही मताधिक्य दिले. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दानवे यांनी विरोधात काम केले असा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला होता. त्यावेळी अब्दुल सत्तार यांनी शपथ घेतली होती. जो पर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करणार नाही तोपर्यंत डोक्यावरची टोपी खाली उतरवणार नाही. आता दानवेंचा पराभव झाला आहे. त्यामुळे ही टोपी आता आपण काढणार असल्याचे सत्तार यांनी स्पष्ट केले आहे. ही टोपी काढण्याचा आपण भव्य कार्यक्रम आयोजित करणार आहोत. त्याचे प्रमुख पाहूणे म्हणून रावसाहेब दानवे यांना बोलावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Advertisement

हेही वाचा - मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना NDA मध्ये आणण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरु

सत्तार नेमके काय म्हणाले? 

रावसाहेब दानवे यांना माझ्याच कार्यकर्त्यांनी पाडलं आहे असे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट पणे सांगितले. दानवें बाबत माझ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्या नाराजीचा फटका त्यांना बसला असे सत्ता यांनी सांगितले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमचे काम केले नाही. दानवे माझ्या प्रचारालाही आले नाहीत. त्यांनी माझ्या बाजूच्या मतदार संघात सभा घेतली पण माझ्यासाठी सभा घेतली नाही असेही ते म्हणाले. त्यामुळे मला मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी हिशोब चुकता करण्याचे ठरवले होते. त्यानुसार त्यांनी दानवेंचा पराभव केल्याचे सत्तारांनी जाहीर पणे सांगितले. 

Advertisement

सत्तार-कल्याण काळे गळा भेट  

जालना लोकसभेचे नवनिर्वाचीत खासदार कल्याण काळे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. सिल्लोड येथे एका कार्यक्रमाला ते आले होते. त्यावेळी काळे यांनी नविसरता सत्तांरांची भेट घेतली. यावेळी दोघांनीही एकमेकांना अलिंगण दिले. अब्दुल सत्तार यांनी कल्याण काळे यांना शुभेच्छा दिल्या. काळे आणि सत्तार यांनी या आधी काँग्रेसमध्ये एकत्र काम केले आहे. जुने संबध यावेळी काळे यांच्या मदतीला आले. शिवाय मित्राला मदत करत सत्तारांनी आपली शपथही पूर्ण केली. 

Advertisement

जालना लोकसभेत दानवेंचा पराभव 

जालना लोकसभेत रावसाहेब दानवे यांचा दारूण पराभव झाला. काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी त्यांचा तब्बल एक लाखा पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. सत्तार यांच्या सिल्लोड विधानसभा मतदार संघातून काँग्रेसच्या कल्याण काळे यांना तब्बल 30 हजाराच्या आसपास मताधिक्य मिळाले होते. हे मताधिक्य निर्णायक ठरले.