Thane News: 'ह्यांच्या बायका पळवून नेल्या का माझ्या नवऱ्याने' शिवसेनेच्या मिनाक्षी शिंदेंची ऑडीओ क्लिप Viral

माझ्या नादाला लागाल तर मी पूर्ण वाट लावेन. रोज पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारायला लावेन असं या ऑडीओ क्लिपमध्ये आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार मिनाक्षी राजेंद्रे शिंदे यांची महापालिकेच्या निवडणुकीत अडचण वाढण्याची शक्यता
  • व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लिपमध्ये मिनाक्षी शिंदे यांनी धमक्या दिल्या आहेत
  • ऑडीओ क्लिपमध्ये जातीविषयक खालच्या दर्जाचे वक्तव्य आणि महिलांना अपशब्द आहेत
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
ठाणे:

रिझवान शेख 

TMC Election 2026: शिवसेना शिंदे गटाच्या महिला उमेदवार आणि ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी राजेंद्रे शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. त्या ठाणे महापालिकेची निवडणूक शिवसेना शिंदे गटाकडून लढवत आहेत. त्यात त्यांची एक ऑडीओ क्लिप जोरदार व्हायरल होत आहे. या त्या अतिशय खालच्या पातळीवर बोलत आहेत. मग त्यात अगदी यथेच्छ शिव्या, महिलांना अपशब्द, ते घरात घुसून मारण्यापर्यंत धमक्या दिल्या आहेत. तेवढ्यावर त्याचं भागलं नाही म्हणून की काय त्यांनी एक जातीच्या बाबतही अतिशय खालच्या दर्जाचे वक्तव्य केले आहे. या ऑडीओ क्लिपची पुष्टी मात्र एनडीटीव्ही मराठी करत नाहीत. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर मिनाक्षी शिंदे यांनी ही स्पष्टीकरण दिले आहेत. 

मिनाक्षी शिंदे या ठाण्याच्या माजी महापौर आहेत. त्या शिवसेना शिंदे गटात आहेत. त्या महापालिकेची निवडणूक लढत आहेत. मात्र प्रचारावरून त्यांच्या वार्डात वाद निर्माण झाला आहे. प्रचारात काही लोक येत नसल्यामुळे त्या संतापल्याचं जी ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे त्यावरून दिसत आहे. ते या ऑडीओ क्लिपमध्ये एका कार्यकर्त्यांला चांगलचं सुनावताना दिसत आहेत. तुमच्यात दम नाही ना मग कशाला काय करायचं. मी जर आज पोरं पाठवली तरा काय इज्जत राहील त्यांची. तू पण प्रचाराला येत नाही. तुमच्या बायका पळवून नेल्या काय माझ्या नवऱ्याने म्हणून त्या सॅड झाले आहेत हे लोक. त्याच्या आई आणि बहिणीला फोन कर. घरात बायका पाठवून मारायला लावेन असं बोलताना त्या दिसत आहेत.  

नक्की वाचा - Pune News: दादा विरुद्ध दादा युद्ध भडकलं! लांडगेंनी थेट अजित पवारांना अंगावर घेतलं, वाद पेटणार?

 त्याने काय फालतूगिरी लावली आहे. आनंद भोईर या व्यक्तीला ही त्या शिव्या देताना दिसत आहेत. तो दुसऱ्यांच्या बायकांच्या घरात झोपतो. त्याची लायकी काढली. त्याला रस्त्यावर आणून मारलं. दुसऱ्याच्या बायकांसाठी तो करतो. त्याची वाट लावायला मला वेळ लागणार नाही. त्याला निवडणुकीनंतर बघून घेईल. हे आग्री आहेत ना त्यांची कशी वाजवायची ती मी वाजवणार असा दम देताना ही त्या दिसत आहेत. त्यानंतर तर त्या अतिशय खालच्या पातळीवर जाताना दिसतात. त्या म्हणताना दिसत आहेत की  त्यांच्या बायकां सोबत कुणी झोपायला गेलं होतं का? ज्यामुळे त्या अशा पळून गेल्या. त्यांना म्हणाव माझ्या समोर या. आता तुम्हाला तुमची लायकी 16 तारखेनंतर दाखवते. तुमची कशी वाट लावते ते बघा. शिवाजीनगरमधली तुमची घरं माझ्या मुळे वाचली. आता तर पुर्ण वाट लावणार असा दम भरतानाही त्या दिसत आहे. 

नक्की वाचा - Uddhav Raj Interview: 'मराठी हिंदू नाही का?', ठाकरेंचे 'ते' 3 प्रश्न महायुतीला चेकमेट करणार?

माझ्या नादाला लागाल तर मी पूर्ण वाट लावेन. रोज पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारायला लावेन. तुम्ही मानपाड्यातच राहाणार आहात ना? की पंधरा दिवसानंतर दुसरीकडे जाणार आहात राहण्यासाठी अशी विचारणा त्या करत आहेत. माझी लेवर बघायची असेल ना तर  सीपीला डायरेक्ट फोन करेन. घरात घूसून तोडफोड करेन असं बोलताना त्या दिसत आहेत. पण या ऑडीओ क्लिपची पुष्टी NDTV मराठी करत नाहीत. दरम्यान ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर मिनीक्षी शिंदे समोर आल्या आहेत. त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्या म्हणाल्या की ही आपली ऑडीओ क्लिप नाही. Ai मार्फत माझ्या दोन ऑडिओ क्लिप बनवल्या गेल्या. त्यानंतर त्या व्हायरल केल्याचा दावा मिनाक्षी यांनी केला आहे. आपल्या विरोधकांचा जातीय तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. माझ्या विरोधात ज्याने फॉर्म भरला आहे त्यांना माहित पडलं आहे ते निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनीही ही ऑडिओ क्लिप व्हायरल केलीआहे असा आरोप त्यांनी केला. या संदर्भात आपण तक्रार दाखल केल्याचं ही त्या म्हणाल्या. विरोधकांनी हे माझ्या विरोधात षडयंत्र रचले आहे असं ही त्या म्हणाल्या.