दादांचा जाहीरनामा भारी की साहेबांचा शपथनामा? साम्य काय?

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरू आहे. अशात मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपले जाहीरनामे प्रकाशित केले आहेत. कुणी त्याला जाहीरनामा म्हटलं आहे, तर कुणी वचननामा म्हटले आहे. नावं जरी वेगळी असली तरी त्यातून मतदारांना आपण काय देणार आहोत, याच्या आश्वसनाची जंत्री त्यात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही आपला शपथनामा जाहीर केला आहे. यातील बऱ्याचश्या गोष्टी या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातही आहेत.

हेही वाचा - 'उबाठा' च नाही तर भाजपासह 'या' पक्षांनाही निवडणूक आयोगानं बजावलीय नोटीस

जाहीरनाम्यातील साम्य काय?  

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसने 22 एप्रिलला आपला जाहीरनामा प्रकाशित केला. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी आज ( गुरूवारी ) शपथनामा प्रकाशित केला आहे. या दोन्ही जाहीरनाम्यात काही गोष्टी या सारख्या आहेत. जाहीरनाम्याच्या सुरूवातीला दोन्ही पक्षांनी संविधानाची प्रत छापली आहे. त्यावर शरद पवार गटाने बांधिलकी संविधानाप्रती असे लिहीले आहे. तर अजित पवारांच्या गटाने त्याचा उल्लेख आमचा मुलमंत्र असा केला आहे.  त्याच्याच पुढच्या पानावर राष्ट्रवादासाठी राष्ट्रवादी असा उल्लेख अजित पवारांच्या जाहीरनाम्यात आहे. तर शरद पवारांनी लोकशाही जगवण्यासाठी असा उल्लेख केला आहे. 

1)  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचे आश्वासन दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून दिले आहे. या आश्वासनाचा उल्लेख अगदी सुरूवातीला दोन्ही जाहीरनाम्यात दिसून येतो. 

2) जातनिहाय जनगणनेला प्राधान्य

जातनिहाय जनगणना करण्यास आपल्या पक्षाचे प्राधान्य असेल असे या दोघांनी आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना करण्यास आपला आग्रह असेल असेही दोघांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

3) अल्पसंख्याकांचे हक्क 

अल्पसंख्याकांबाबत दोघांनी ही आपल्या जाहीरनाम्यात विशेष उल्लेख केला आहे. अल्पसंख्यांकाचे विशेष हक्क जपण्याचा पक्षाचा मानस असल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे. शिवाय सच्चर आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. तर राष्ट्रीय स्तरावर मौलाना आझाद संशोधन व प्रशिक्षण संस्था असावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना या माध्यमातून रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. 

4) शेतमालाला कायद्याने हमी भाव देणार 

शेती मालाला हमी भाव मिळावा यासाठी देशभरातले शेतकरी आक्रमक आहे. त्यांनी दिल्लीपर्यंतही त्यासाठी धडक दिली होती. ही मागणी पाहात शरद पवारांनी हमी भावाचा कायदाच करू असे आश्वासन दिले आहे. तर अजित पवरांनीही त्याच पद्धतीचे आश्वासन दिले आहे.   

Advertisement


5)कंत्राटी कामगारांना योग्य मानधन 
खाजगी कंपन्यात कंत्राटी कामगारांना दरमहा २० हजार देऊ, त्यापद्धतीचा नियम केला जाईल असे अजित पवारांनी आश्वासन दिले आहे. अशाच पद्धतीचे आश्वासन शरद पवार गटानेही दिले आहे. त्यात त्यांनी राईट टू अॅप्रेंटेसशिप'चा उल्लेख केला आहे. या अंतर्गत एक लाख विद्या वेतन देण्यात येईल असे सांगितले आहे. शिवाय जेष्ठ नागरीकांनाही सोयी सुविधांमध्येही या जाहीरनाम्यात साम्य दिसते. 

यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अजित पवारांनी आपल्या जाहीरनाम्यात सांगितले आहे. मात्र याबाबतचा कोणताही उल्लेख शरद पवारांच्या शपथपत्रात कुठेही दिसत नाही. अजित पवार हे पक्षातून वेगळे झाल्यानंतर त्यांनी आपण यशवंतरावांचा विचार आणि राजकीय वारसा पुढे नेणार असल्याचे सांगितले होते. 

Advertisement