बॉलिवूडने गेल्या काही वर्षांत अनेक कलाकारांना नावारूपाला येताना पाहिले आहे. शाहरुख खान, विद्या बालन, आर. माधवन आणि यामी गौतम यांसारख्या कलाकारांचे टेलिव्हिजनमधून चित्रपटांमध्ये येणे हे मनोरंजन उद्योगातील बदलाचे द्योतक होते. आतापर्यंत छोट्या-मोठ्या भूमिकांमध्ये दिसलेली एक अभिनेत्री आता करोडोंची कमाई असलेल्या एका जागतिक चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.
दोन भागांमध्ये येणाऱ्या या महाकाव्य मालिकेत एक मोठी भूमिका साकारण्यासाठी सज्ज झालेली आसामी अभिनेत्री दुसरी कोणी नसून सुरभि दास आहे. ती 'रामायण: भाग 1 आणि 2' मध्ये दिसणार आहे. ती अभिनेता रवी दुबे याच्या लक्ष्मणच्या पत्नीच्या, म्हणजेच उर्मिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. ऋषी वाल्मिकींच्या 'रामायण' आणि ऋषी तुलसीदासांच्या 'रामचरितमानस'मध्ये उर्मिलेचा उल्लेख भगवान रामांचे धाकटे भाऊ लक्ष्मणाची पत्नी म्हणून करण्यात आला आहे. नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनणारा हा चित्रपट या दोन्ही प्राचीन ग्रंथांवर आधारित आहे.
सुरभि दास कोण आहे?
सुरभि कलर्स टीव्हीवरील 'नीमा डेन्जोंगपा' या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते. तिने बंगाली चित्रपट 'दादा तुमी दुस्तो बोर' (2022) मध्येही काम केले आहे. टेलीचक्करला दिलेल्या एका मुलाखतीत सुरभिने चित्रपटात भगवान रामाची भूमिका साकारणाऱ्या रणबीर कपूरच्या व्यावसायिक वृत्तीचे कौतुक केले. ती म्हणाली, "त्यांचे व्यक्तिमत्व अतुलनीय आहे. ते एक खूप प्रामाणिक अभिनेते आहेत. त्यांच्या अभिनयातून खूप काही शिकता येते. अशा शानदार प्रोजेक्टचा भाग असल्याचा मला खूप आनंद वाटतो." असं ती म्हणाली.
सुरभि पुढे म्हणाली, "आम्ही जास्त बोलू शकलो नाही कारण सेटवर त्यांना त्यांच्या भूमिकेत रहावे लागत होते, पण हो, आम्ही एकमेकांशी संवाद साधला. ते सर्वांशी आदराने वागतात. मला वाटते की हे एक चांगल्या व्यक्ती असण्याचे महत्त्वाचे लक्षण आहे. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी, आम्ही नेहमीच्या गप्पा मारल्या आणि त्यांच्यासोबत इतक्या जवळून काम करणे अद्भुत होते."सुरभिने पुढे सांगितले, "रणबीरपेक्षा, मी साई (Sai Pallavi) सोबत जास्त वेळ घालवला. ती खूप गोड आणि मनमिळाऊ अभिनेत्री आहे. एकूणच, हा एक चांगला अनुभव होता. मी चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे.
4000 कोटींचे बजेट
चित्रपटाच्या निर्मात्याने नुकतेच सांगितले होते की, दोन भागांमध्ये येणारी ही मालिका 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठ्या बजेटवर बनवली जाईल. पूर्वी चित्रपटाचे बजेट सुमारे 1600 कोटी रुपये असेल असा अंदाज होता. मात्र, या प्रोजेक्टशी संबंधित एका सूत्राने आता पुष्टी केली आहे की, चित्रपटाचे अंतिम बजेट सुमारे 500 दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच भारतीय चलनानुसार 4100 कोटींहून अधिकच्या आसपास आहे.