
यशराज फिल्म्स (YRF) च्या बहुचर्चित 'सैयारा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पण आता या चित्रपटातील टायटल ट्रॅकने संगीत जगतातही इतिहास रचला आहे. मोहित सूरी दिग्दर्शित 'सैयारा' चित्रपटातील गाणे स्पॉटिफाय ग्लोबल टॉप ५० चार्टवर टॉप ७ मध्ये स्थान मिळवणारे पहिले बॉलिवूड गाणे ठरले आहे. अहान पांडे आणि अनीत पड्ढा या नवोदित कलाकारांच्या पदार्पणाचा चित्रपट 'कहो ना प्यार है' नंतरचा सर्वात मोठा लॉन्च मानला जात आहे.
YRF चे सीईओ अक्षय विधानी निर्मित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करून एक नवीन लाट आणली आहे. 'सैयारा' चित्रपटाने अवघ्या ४ दिवसांत १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे, ज्यामुळे अहान आणि अनीत हे एवढ्या लवकर १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारे पहिले नवोदित कलाकार ठरले आहेत.
चित्रपटाचा संगीत अल्बमही ऐतिहासिक कामगिरी करत आहे. तनिष्क, फहीम-अर्सलान यांनी संगीतबद्ध केलेला टायटल ट्रॅक, जुबिन नौटियाल आणि शिल्पा रावचे 'बर्बाद ', विशाल मिश्राचे 'तुम हो तो', सचेत-परंपराचे 'हमसफर', मिथुन आणि अरिजीत सिंहचे 'धुन' (Dhun), आणि श्रेया घोषालचे 'सैयारा रिप्राइज' ही सर्व गाणी चार्टवर सातत्याने आघाडीवर आहेत. 'सैयारा' अल्बममधील सर्व ६ गाणी स्पॉटिफाय ग्लोबल टॉप ५० चार्टमध्ये टॉप १० मध्ये होती.
(नक्की वाचा- Saiyaara Cast Fees: पहिल्याच चित्रपटासाठी छप्परफाड पैसा! 'सैयारा'साठी अहान-अनितने किती फी घेतली?)
गाण्यांची क्रमवारी
- टायटल ट्रॅक सलग ५ दिवसांपासून नंबर १ वर आहे.
- धुन - ३ नंबरवर
- सैयारा (रिप्राइज) - चौथ्या नंबरवर
- हमसफर - सहाव्या नंबरवर
- बर्बाद - सातव्या नंबरवर
- तुम हो तो - नवव्या नंबरवर
फक्त भारतात २४ तासांत ३६.१ लाख स्ट्रीम्ससह 'सैयारा' एका दिवसात सर्वाधिक ऐकले जाणारे बॉलिवूड गाणे ठरले. तर जागतिक स्तरावर ३८.७ लाख स्ट्रीम्सची नोंद झाली. स्पॉटिफाय ग्लोबल टॉप ५० चार्टवर 'सैयारा' ७ व्या क्रमांकावर पोहोचले, हे स्थान मिळवणारे ते पहिले बॉलिवूड गाणे बनले आहे. यापूर्वी केवळ 'हनुमानकाइंड' (Hanumankind) चे 'बिग डॉग्स' (Big Dogs), जे बॉलिवूडचे नाही, ते ७ व्या क्रमांकापर्यंत पोहोचले होते.
(नक्की वाचा- Saiyaara: सैयाराची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी! जे अन्य कुणाला जमलं नाही ते अहान पांडेने करून दाखवलं)
सोशल मीडियावर चाहते #OnLoop हा ट्रेंड सुरू करत आहेत, ज्यात लोकांना 'सैयारा'ला नंबर १ गाणे बनवण्याचे आवाहन केले जात आहे. वाईआरएफचा स्वतःचा म्युझिक लेबल YRF Music गेल्या दोन दशकांपासून ओरिजिनल आयपीला प्रोत्साहन देत आहे. हा लेबल भारतातील टॉप ५ फिल्म म्युझिक लेबल्समध्ये समाविष्ट आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world