मुस्लीम अभिनेत्याशी लफडं अन् ब्रेकअप..आता करतेय उद्योगपतीशी लग्न, 39 वर्षांची हिरोईन आहे तरी कोण?

पवित्रा पुनिया ही टेलिव्हिजनमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, जी नेहमीच तिच्या नातेसंबंधांमुळे चर्चेत राहिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pavitra Punia Wedding News
मुंबई:

Pavitra Punia Wedding News:  पवित्रा पुनिया ही टेलिव्हिजनमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, जी नेहमीच तिच्या नातेसंबंधांमुळे चर्चेत राहिली आहे.‘बालवीर',‘इश्क की दास्तां'यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेली पवित्रा पुनिया सलमान खानच्या वादग्रस्त शो‘बिग बॉस 14'मध्येही सहभागी झाली होती.या शोमध्ये तिची प्रेमकहाणी एजाज खानसोबत सुरू झाली.त्यानंतर या कपलच्या अफेअरच्या जोरदार रंगू लागल्या. या दोघांनी गुपचूप साखरपुडा केला होता. पण फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांच्या ब्रेकअपने सगळ्यांना आश्चर्यचकित केले. बिग बॉस 14 फेम पवित्रा पुनियाने 2020 मध्ये एजाज खानच्या प्रेमात पडली, पण कालांतराने त्यांच्या दुरावा निर्माण झाला. अशातच पवित्रा आता एका अमेरिकन उद्योगपतीशी लग्नगाठ बांधणार असून तिने होणाऱ्या नवऱ्याचं नाव जाहीर केलंलं नाहीय.

अमेरिकन उद्योगपतीसोबत लग्नगाठ बांधणार

पवित्रा लवकरच मिस पवित्रावरून मिसेस पुनिया होणार आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर करून तिच्या नात्याबाबत माहिती दिलीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार,पवित्रा पुनिया सध्या आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि खास क्षणांचा आनंद घेत आहे.ती आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी खूप उत्सुक आहे.पवित्रा आपल्या अमेरिकास्थित व्यावसायिक प्रियकरासोबत 2026 च्या मार्च महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहे, अशी माहिती आहे. त्यांच्या लग्नात फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्रच उपस्थित राहणार आहेत, असंही समजते. 

नक्की वाचा >> आजी अन् वडिलांचं निधन,आईने केलं दुसरं लग्न..विद्यार्थ्यानं आश्रमशाळेतच आयुष्य संपवलं! कारण काय?

पवित्र  पुनियाचं एजाज खानसोबतच अफेअर नव्हतं, तर

टीव्ही अभिनेत्रीने यावर्षी 22 ऑक्टोबर रोजी तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून प्रियकराविषयी माहिती शेअर केली होती. हा फोटो शेअर करत पवित्राने लिहिले होते की, “लॉक इन..मी हे अधिकृतपणे सांगितले आहे की लवकरच लग्न करणार आहे.” बिग बॉस 14 फेम पवित्रा पुनियाने फक्त एजाज खानसोबतच प्रेमसंबंध ठेवले नाहीत,तर अभिनेत्रीचे नाव पारस छाबडा आणि प्रतीक सहजपाल यांसारख्या कलाकारांसोबतही जोडले गेलं होतं.

Advertisement

नक्की वाचा >> संजय दत्त सेटवर हात पकडायचा, मिठी मारायचा..Big Boss मधून बाहेर पडताच अभिनेत्रीने केली पोलखोल

या दोघांव्यतिरिक्त अभिनेत्रीने 2015 मध्ये सुमित महेश्वरी,जो एक व्यावसायिक होता, त्याच्यासोबत साखरपूडा केला होता.परंतु, दोघांच्या नात्यात लवकरच दुरावा निर्माण झाला आणि त्यानंतर 2020 मध्ये सुमितने पवित्रावर अनेक गंभीर आरोप केले होते.