मनोज सातवी, प्रतिनिधी
Palghar Shocking News: पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे आदिवासी सेवा मंडळाच्या निवासी आश्रमशाळेत आज पुन्हा एक धक्कादायक घटना घडली. आठवीत शिकणाऱ्या तुषार संतोष वांगड (वय 14) या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी 11.45 वाजताच्या सुमारास प्रार्थनेच्या वेळी तुषारने त्याच्या रुममध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला.या घटनेची माहिती मिळताच विद्यार्थी,शिक्षक आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
तुषारने जीवन संपवण्याचं टोकांच पाऊल का उचललं?
मिळालेल्या माहितीनुसार, तुषारच्या कुटुंबाची परिस्थितीही अत्यंत बिकट होती. तुषारच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर त्याच्या आईने दुसरं लग्न केलं. तेव्हापासून त्याची त्याची आजी त्याचं पालनपोषण करत होती. गेल्या वर्षी त्याच्या आजीचंही निधन झालं. त्यामुळे सवादा वांगड पाडा येथे राहणारे तुषारचे मामा त्याचं संगोपन करत होते.तुषार मानसिक तणावात होता का?आश्रम शाळेतील शिक्षक किंवा विद्यार्थ्यांकडून काही त्रास होता का?तुषारने आत्महत्या का केली? या प्रश्नांची उत्तरे अद्यापही गुलदस्त्यातच आहेत. कुटुंबीयांकडून तुषार काही त्रास होता का, या सर्व गोष्टींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
नक्की वाचा >> Pune News:पुण्यात सर्वात मोठी कारवाई! नेत्यांच्या नातेवाईकांच्या रिसॉर्टवर बुलडोझर, शहराजवळील 300 बांधकामेही..
10 ऑक्टोबरलाही घडली होती आत्महत्येची घटना
पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.काही आठवड्यांपूर्वीच वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथील आश्रमशाळेत नववी आणि दहावीतील दोन विद्यार्थ्यांनी 10 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच विक्रमगडमधील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी,मानसिक आरोग्याविषयी आणि प्रशासनाच्या देखरेखीविषयी गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विक्रमगड पोलिसांनी तुषारच्या मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
हे ही वाचा >> Gauri Garje News: डॉ. गौरी गर्जे आत्महत्या की खून? पती अनंत, दीर, नणंदेविरोधात तक्रार, 'तो' पुरावा आला समोर
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world